शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बचतीच्या माध्यमातून केले नागपूरच्या स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:54 AM

विविध उपक्रम राबवून गृहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारायला द धरमपेठ मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा नीलिमा बावणे यांनी पुढाकार घेतला.

ठळक मुद्दे९० टक्के महिलांना दिला रोजगार अनेकांना उद्योजिका बनविण्याचे ‘मिशन’

मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सामान्य महिलांचा विचार केल्यास बँकिंग क्षेत्रात त्या अजूनही मागे आहेत. संगणक आणि मोबाईलच्या काळात त्यांना बँकिंग व्यवहाराची बारीकसारीक माहिती करून देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत विविध उपक्रम राबवून गृहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारायला द धरमपेठ मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा नीलिमा बावणे यांनी पुढाकार घेतला.नीलिमा बावणे या स्वत: एकॉनॉमिक्स विषयात एम.ए. आहेत. महिलांच्या विकासासाठी त्यांनी अलीकडेच महिला अध्यापन (वुुमेन स्टडीज) या विषयात एम.ए. ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्या सांगतात, महिलांचा मूळ स्वभाव बचतीचा आहे. त्यांच्या आर्थिक विकासाचा ध्यास घेऊन आमची सोसायटी कार्य करीत आहे. सोसायटीच्या ३९ शाखांमध्ये ९० टक्के महिला कार्यरत आहेत. महिलांना बचतीची सवय लागावी आणि त्यांनी बँकिंग खाते सुरू करावे, यासाठी सोसायटी वारंवार मोहीम राबविते. यासाठी तीन वर्षांपूर्वी ‘बँकिंग व्हील’ योजना सुरू केली. बँकिंग व्हील हे वाहन संबंधित भागात जाऊन बचतीसाठी खाते उघडण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करते. या माध्यमातून असंघटित कामगार महिलांना जोडले आहे. अडचणीत बचतीचा पैसा त्यांच्याच कामी येतो. शिवाय महिलांना उद्योजिका बनविण्याचे सोसायटीचे मिशन आहे. अनेकांनी गृहउद्योग यशस्वीरीत्या सुरू केले आहेत.त्यामुळे त्यांची समाजात पत निर्माण झाली आहे. महिलांना बचतीवर अर्धा टक्के जास्त व्याज देण्यात येते. लहानसहान व्यवसाय करणाऱ्या महिलांचे स्वत:च्या घराचे स्वप्न सोसायटीमुळे पूर्ण झाले आहे. सोसायटीची स्थापना १७ मे १९९४ ला धरमपेठ येथे झाली. आता सोसायटीचा व्याप मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात आहे. शाखांमध्ये युवती व महिलांना नोकरी मिळावी आणि त्यांच्यात बँकिंगची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तज्ज्ञांतर्फे त्यांना तीन महिन्यांचे बँकिंग प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणार्थींना शाखांमध्ये नोकरी दिली आहे. महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी धरमपेठेतील मुख्य शाखेत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. बचतीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असा मोलाचा सल्ला बावणे यांनी दिला.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस