शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नागपुरात निर्माणाधीन हॉस्पिटलच्या ऑडिटोरियमला भीषण आग, १२ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 21:23 IST

कस्तूरचंद पार्क लगतच्या निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीमधील भव्य ऑडिटोरियमला बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आग लागली. ऑडिटोरियममधील सोफा व फोमला आग लागल्याने सर्वत्र धूर पसरला. आगीत अडकलेले १२ कामगार धुरात गुदमरल्याने बेशुद्ध पडले. त्यांना उपराचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनीही यासाठी मदत केली. 

ठळक मुद्देदोघांची प्रकृती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कस्तूरचंद पार्क लगतच्या निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीमधील भव्य ऑडिटोरियमला बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आग लागली. ऑडिटोरियममधील सोफा व फोमला आग लागल्याने सर्वत्र धूर पसरला. आगीत अडकलेले १२ कामगार धुरात गुदमरल्याने बेशुद्ध पडले. त्यांना उपराचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनीही यासाठी मदत केली. 

मेयो रुग्णालयात नऊ कामगारांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात उमेश येरपुडे(४०), योगश डेहनकरे(२५), राजेंद्र शर्मा(२५), धर्मिन वर्मा(४०), उमाबाई भंडारी(४०), जनाबाई निर्मलकर (४०), गणेश पेटकर, राहुल कावळे व पलाश लोहे आदींचा समावेश आहे. रामकृष्ण मौर्य, रामू मौर्य व वेंकटरमण नायडू यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील रामकृष्ण मौर्य, रामू मौर्य यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 
नजीकच्या एलआयसी कार्यालयाजवळ परवाना मेमोरियल ट्रस्टच्या निर्माणाधीन नऊ मजली इमारतीतील दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर एक हजार आसन क्षमतेच्या ऑडिटोरियमचे बांधकाम सुरू आहे. तर वरच्या माळ्यावर      एसपीएनव्ही कॉर्पोरेशनच्या किंग्जवे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू आहे. येथे १५० कामगार कामावर आहेत. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास लंच टाईममध्ये ऑ डिटोरियमला अचानक आग लागली. आगीचे निश्चित कारणे पुढे आले नाही. मात्र ऑडिटोरियमध्ये वेल्डिंगचे काम करताना शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
फोमचा सोफा व खुर्च्यांनी पेट घेतल्याने थोड्याच वेळात आग संपूर्ण ऑडिटोरियमध्ये पसरली. फोममुळे सर्वत्र विषारी धूर पसरला. आगीतून जीव वाचविण्यासाठी कामगार मिळेल त्या मार्गाने इमारतीच्या बाहेर पडले. परंतु अनेक कामगार आगीत अडकले. धुरामुळे काही जण बेशुद्ध पडले. थोड्याच वेळात अग्निशमन विभागाचे पथक व सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. 

अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्यासोबतच लोकांच्या मदतीने आगीत बेशुद्ध पडलेल्या कामगारांना बाहेर काढून उपचारासाठी मेयो रुग्णालयात रवाना केले. घटनास्थळी आठ ते दहा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. 

 

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटल