शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या बजाजनगर पोलिसांनी केली घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:07 IST

न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना घर मालकाच्या मदतीने बजाजनगर पोलिसांनी कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने, विदेशी चलन तसेच अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक कागदपत्र चोरून नेले. या प्रकरणाची तक्रार करूनही पोलीस दोषीवर कारवाई करायला टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप पीडित भाडेकरू डॉ. शिवशंकर दास तसेच डॉ. क्षिप्रा उके आणि भीम आर्मीचे  जिल्हाध्यक्ष प्रफुल शेंडे, मुकेश खडतकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देघरमालकासोबत संगनमत : भीम आर्मीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना घर मालकाच्या मदतीने बजाजनगर पोलिसांनी कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने, विदेशी चलन तसेच अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक कागदपत्र चोरून नेले. या प्रकरणाची तक्रार करूनही पोलीस दोषीवर कारवाई करायला टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप पीडित भाडेकरू डॉ. शिवशंकर दास तसेच डॉ. क्षिप्रा उके आणि भीम आर्मीचे  जिल्हाध्यक्ष प्रफुल शेंडे, मुकेश खडतकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पीडितांना तातडीने न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीकडून यावेळी देण्यात आला.दास आणि उके हे दोघेही जेएनयूचे पीएचडीधारक आहेत. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरात त्यांनी जगदीश लांबे यांच्याकडून २०१५ मध्ये भाड्याने घर घेतले. त्यावेळी ११ महिन्यांचा करार करण्यात आला होता. पुढे करारात वाढ करण्यास घरमालक यांनी नकार दिला. मात्र दुसरे घर मिळेपर्यंत १० टक्के भाडेवाढ करून तेथेच राहण्यास सहमती दिली. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही मागासवर्गीय असल्याचे कळल्यानंतर घरमालकाचा मुलगा तुषार लांबे यांनी घर खाली करण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. न्यायालयामार्फत नोटीस दिली. हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान ८ सप्टेंबर २०१८ ला आम्ही दिल्लीत असताना तुषार लांबेसह बजाजनगरचे तीन पोलिस विनोद क्षीरसागर, प्रमोद मोहित आणि संजय सिंग ठाकूर आमच्या घरी आले. कोणतीही नोटीस न देता त्यांनी घराचे कुलूप तोडले. घरातील सर्व सामान गच्चीवर फेकले. विदेशी चलन, सोन्याचे दागिन्यांसह लाखोंचे साहित्य चोरून नेले.याच्यासोबत शैक्षणिक कागदपत्रे आणि रिसर्चचे अहवालही चोरून नेले. दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर हा सर्व प्रकार दिसला. त्याची बजाजनगर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. प्रथम त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. नंतर वरिष्ठांच्या आदेशावरून बजाजनगर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. मात्र एफआयआरमध्ये चुकीची माहिती मांडली.चार महिन्यांत आठ तपास अधिकारीघरमालकाच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. चार महिन्यात आठ तपास अधिकारी बदलण्यात आले असून कारवाईची तत्परता दाखवण्यास पोलीस तयार नाही. आम्ही मागासवर्गीय असल्यामुळेच हा अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस