शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षाच्या मुलाची कमाल! अमेरिकेतील कंपनीकडून मिळाली ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर, पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 12:06 IST

घरातील जुन्या ‘लॅपटॉप’च्या मदतीने वेदांतने ‘युट्यूब’वर ‘सॉफ्टवेअर’शी संबंधित अनेक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले.

नागपूर : आजकालची पोरं दिवसभर मोबाईलला खिळून असतात. पण याच  मोबाईल आणि लॅपटॉपमुळे एका १५ वर्षीय मुलाला अमेरीकेतील कंपनीकडून तब्बल ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर मिळाली. हो हे खरं आहे. ‘युट्यूब वरून ‘सॉफ्टवेअर कोडिंग’चे शिक्षण घेत कुणालाही न सांगता या मुलाने एका स्पर्धेत भाग घेतला आणि दोन दिवसांत २,०६६ ओळींचे ‘कोडिंग’ केले. त्याने केलेल्या कोडिंगची दखल अमेरिकेतील एका कंपनीने घेत त्याला नोकरी ऑफर केली. मात्र, वय लहान असल्याने असल्याने त्याला ती नोकरी स्वीकारता आली नाही.

नागपूरचा वेदांत देवकाटे हा शहरातीलच शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो. त्याने आपल्या शाळेत एक रडार सिस्टम मॉडल डिजाइन तयार केले होते. या स्पर्धेत त्याला सुवर्णपदक मिळालं होतं. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. मात्र, वेदांतने या वेळेचा सदुपयोग केला. घरातील जुन्या ‘लॅपटॉप’च्या मदतीने त्याने ‘युट्यूब’वर ‘सॉफ्टवेअर’शी संबंधित अनेक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले.

घरच्याघरी युट्यूबवर तो सॉफ्टवेअर कोडिंग शिकला. आईच्या जुन्या लॅपटॉपवर तो त्याचं काम करायचा. असंच एक दिवस इंटरनेट सर्फिंग करताना त्याला वेबसाइट डेव्हलपमेंट स्पर्धेची लिंक सापडली व त्याने त्यात सहभाग घेतला. आणि दोन २,०६६ ओळींचे कोडिंग करून एक हजार ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. त्याची ही कामगिरी पाहता न्यू जर्सीच्या कंपनीने त्याला चक्क ३३ लाख रूपयांची नोकरी ऑफर केली. मात्र, वेदांतचे वय फक्त १५ वर्ष असल्याने कंपनीने सदर प्रस्ताव मागे घेतला. असे असले तरी  तरी त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला नव्याने ‘ऑफर’ देणार असल्याचं आश्वासन कंपनीने वेदांतला दिलं आहे.  इतक्या लहान वयात केलेल्या या हटके कामगिरीमुळे वेदांतचे मोठे कौतुक होत आहे. 

वेदांतने स्वत:ची एक वेबसाईट तयार केली आहे. त्याने लॉकडाऊनच्या काळात तब्बल २० हून अधिक ऑनलाइन कोर्सेसचे शिक्षण पूर्ण केले. यामध्ये सी++, जावा, यासह अनेक कठीण कोर्सेसचा समावेश आहे. ज्यावेळी त्याने ही स्पर्धा जिंकली आणि त्याला ३३ लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर आली तेव्हा वेदांतच्या कुटुंबीयांना त्याच्यात असलेल्या टॅलेंटची माहिती समजली हे विशेष.

टॅग्स :Educationशिक्षणtechnologyतंत्रज्ञानjobनोकरीStudentविद्यार्थीnagpurनागपूर