शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

नागपूरकरांना अनुभवता येणार लाइट, कॅमेरा, ॲक्शनची कमाल; रामटेकमधील नवरगावात साकारणार 'फिल्मसिटी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:14 IST

Nagpur : १२८.३५ एकर जागा निश्चित करण्यास मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर/रामटेक : देशाचे केंद्रबिंदू नागपुरात आहे. त्याचप्रमाणे अनेक ऐतिहासिक वास्तू, स्थळे आहेत. आता 'फिल्म सिटी'ही (चित्रनगरी) साकार होणार आहे. यासाठी रामटेक तालुक्यातील नवरगावाची निवड करण्यात आली आहे. लवकरच याचे कामही सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात पहिल्यांदा मराठी माणसाने मराठी चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपट निर्मितीचा पाया रचला. चित्रपटांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्यासाठी मुंबई व कोल्हापूर येथील चित्रपट सृष्टीच्या धर्तीवर नागपूर येथे भव्य चित्रनगरी (फिल्म सिटी) निर्माण करण्याचा निर्णय तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता.

त्यानंतर वरिष्ठ अधिकारी कामालाही लागले होते. त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क करत जागेची माहिती मागवली. त्यानंतर लगेच प्रशासनही मिशन मोडवर आले. जागेसाठी शोधमोहीम सुरू झाली. फिल्म सिटीच्या संचालक मंडळास प्रशासनाकडून मौदा, कळमेश्वर व रामटेक तालुक्यातील जागा दाखविण्यात आली होती. या तीनही जागांची विस्तृत माहिती संचालक मंडळाकडे देण्यात आली.

त्यानंतर रामटेक तालुक्यातील शिरपूर व नवरगाव या दोन गावांना पसंती दाखविण्यात आली. या दोन्ही ठिकाणी १०० एकर जागा आहे. मात्र नवरगाववर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी नवरगाव परिसरात सर्व्हे क्रमांक ७९/१ व क्षेत्र ५१.३४ हे. (१२८.३५ एकर) इतकी जागा निश्चित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. फिल्म सिटी सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे. त्यामुळे याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते. 

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर संपूर्ण रामटेक हा परिसरच नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. नवरगाव हे रामटेक शहरापासून तुमसर रोडवर ५-६ किमीच्या अंतरावर आहे. जवळच खिंडसी तलाव आहे. समोर जंगलाचे विस्तीर्ण क्षेत्र असून निसर्ग सौंदर्य आहे. त्यामुळे या जागेची निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते.

"अनेक दिवसांपासून विदर्भात चित्रपटनगरी उभारण्याचे स्वप्न होते. ते आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. चित्रनगरीमुळे रामटेकच्या पर्यटन क्षेत्राला आणखी चालना मिळेल. रामटेकचे नाव चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नावारूपाला येईल. स्थानिक कलावंतांना बेरोजगार युवक-युवतींना कामाची संधी मिळेल." - आशिष जयस्वाल, आमदार

टॅग्स :nagpurनागपूर