कोरोना योद्ध्यांचे नागपूरकर सदैव ऋणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:22 IST2020-07-02T00:21:24+5:302020-07-02T00:22:50+5:30
कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्रपणे सेवा देत आहे. त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत नाही, कोरोना योद्ध्यांचे नागपूरकर सदैव ऋणी असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

कोरोना योद्ध्यांचे नागपूरकर सदैव ऋणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्रपणे सेवा देत आहे. त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत नाही, कोरोना योद्ध्यांचे नागपूरकर सदैव ऋणी असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.
बुधवारी महापौरांनी शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र (आरपीटीएस) आणि व्हीएनआयटी येथील विलगीकरण कक्षाला भेट दिली. याप्रसंगी उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, झोन सभापती अमर बागडे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक किशोर जिचकार, नगरसेविका वर्षा ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी संदीप जोशी यांनी विलगीकरणातील नागरिकांची विचारपूस करून जेवण आणि इतर सर्व सुविधांसंबंधी माहिती जाणून घेतली. तक्रार असल्यास त्वरित संबंधितांना कळविण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले. आज आषाढी एकादशी निमित्ताने विलगीकरणातील सर्व नागरिकांसाठी राधास्वामी सत्संग न्यासतर्फे विशेष फराळ देण्यात आल्याची माहिती दिली.