गुरू-शनिच्या महायुतीचे नागपूरकरांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 10:39 PM2020-12-21T22:39:10+5:302020-12-21T22:40:49+5:30

Jupiter-Saturn alliance गुरू आणि शनिच्या अद्भूत अशा खगोलीय घटनेचा साक्षात्कार नागपूरकरांनी घेतला. तब्बल ३९७ वर्षांनी हे दोन्ही ग्रह आज एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. अर्थात हे अंतरही कोट्यवधी किमी अंतराचे होते. मात्र, पृथ्वीवरून जणू हे दोन्ही ग्रह एकमेकांचे हस्तांदोलन करताहेत की काय, असे भासत होते.

Nagpurites seen Jupiter-Saturn alliance | गुरू-शनिच्या महायुतीचे नागपूरकरांनी घेतले दर्शन

गुरू-शनिच्या महायुतीचे नागपूरकरांनी घेतले दर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुरू आणि शनिच्या अद्भूत अशा खगोलीय घटनेचा साक्षात्कार नागपूरकरांनी घेतला. तब्बल ३९७ वर्षांनी हे दोन्ही ग्रह आज एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. अर्थात हे अंतरही कोट्यवधी किमी अंतराचे होते. मात्र, पृथ्वीवरून जणू हे दोन्ही ग्रह एकमेकांचे हस्तांदोलन करताहेत की काय, असे भासत होते.

आपल्या सूर्यमालेत गुरू आणि शनि हे दोन महाकाय पिंड म्हणून ओळखले जातात. पृथ्वीपेक्षा गुरू ११ पटीने तर शनि ९ पटीने मोठा आहे. सूर्याभोवती भ्रमण करताना दर २० वर्षांनी असा योग येत असतो. मात्र, इतक्या जवळ येण्याचा योग दर ४०० वर्षांनी येत असतो. नागपूरच्या रामन विज्ञान केंद्रात या अद्भुत योगाचे दर्शन घेण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. चार मोठे टेलिस्कोप लावण्यात आले आहे. ८ डिसेंबरपासूनच नागरिकांना हे दोन्ही ग्रह जवळ येत असल्याचे टेलिस्कोपद्वारे दाखविले जात आहे. २१ डिसेंबरपर्यंत तब्बल ११०० लोकांनी या खगोलीय घटनेचा साक्षात्कार घेतल्याचे रामन विज्ञान केंद्राचे महेंद्र वाघ यांनी सांगितले. २३ डिसेंबरपर्यंत नागरिकांना हे दर्शन घेता येणार आहे.

Web Title: Nagpurites seen Jupiter-Saturn alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.