अकोल्याच्या मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या कलाविष्काराने नागपूरकर मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:00 IST2018-01-12T12:56:03+5:302018-01-12T13:00:44+5:30
नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित सृजनअंतर्गत सिव्हील लाईन्समधील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत अकोल्याच्या मधुमिता वऱ्हाडपांडे यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन सुरु झाले आहे.

अकोल्याच्या मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या कलाविष्काराने नागपूरकर मंत्रमुग्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित सृजनअंतर्गत सिव्हील लाईन्समधील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत अकोल्याच्या मधुमिता वऱ्हाडपांडे यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन सुरु झाले आहे. मुक्त अमूर्त (अॅबस्ट्रॅक्ट) आणि निसर्गदृष्य (लँडस्केप) या दोन विषयांची निवडक चित्रे त्यांनी या त्यांच्या पहिल्याच चित्रप्रदर्शनात समाविष्ट केली आहेत. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे वरिष्ठ लेखा व प्रशासन अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाट्न गुरुवारी करण्यात आले.
चित्रकलेचा आपल्याला कुठलाही गंध नव्हता. शालेय जीवनात जी चित्रे काढली व ज्या प्राथ
काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरावावे या त्यांच्या ज्येष्ठ मुलाने केलेल्या सूचनेचा स्वीकार करून त्यांनी हे प्रदर्शन प्रथम नागपुरात भरवले आहे.
कलेचा अविष्कार हा वयाच्या कुठल्याही टप्प्यात व्यक्तीला जाणवू शकतो, त्याने आपल्यातील त्या सुप्त शक्तींना बाहेर येण्याची संधी व वेळ दिला पाहिजे असे मत मधुमती वऱ्हाडपांडे व्यक्त करतात. हे प्रदर्शन येत्या १६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.