शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.ची आर्थिक कोंडी : तिजोरीत पैसाच नाही, तरीही केले पुनर्नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:08 IST

आभासी बजेट सादर करून, प्रत्यक्षात तिजोरीत पैसा नसतानाही, नसलेल्या पैशाचे पुनर्नियोजन केल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पैसेच नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आभासी बजेट सादर करून, प्रत्यक्षात तिजोरीत पैसा नसतानाही, नसलेल्या पैशाचे पुनर्नियोजन केल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी झाली आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेत लाभ मिळविलेल्या लाभार्थ्यांना पैसे द्यायला जि.प.कडे पैसे नसल्याचे दिसते आहे.२०१८-१९ या आर्थिक वर्षात वित्त सभापती उकेश चौहान यांनी ३७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी ३० ते ३२ कोटीच्या घरातच रक्कम तिजोरीत जमा झाली होती. बजेटनुसार पाच ते सात कोटींची प्रत्यक्ष तूट दिसून आली होती. असे असतानाही जवळपास सहा कोटीच्या रकमेचे पुनर्नियोजन करण्यात आले होते. म्हणजे तिजोरीत पैसे नसतानाही त्या निधीचे पुनर्नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे ही बाब अधिकाऱ्यांना माहीत असतानाही, त्यांनीही त्यात दुरुस्ती केली नाही. सत्ताधाऱ्यांकडूनही त्यावर पांघरूण घालण्यात आले. त्यामुळे आज जिल्हा परिषदेला आर्थिक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.मागील वर्षीच्या योजना व त्यांच्या लाभार्थ्यांना यावर्षी कायम करण्यात आले. लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेत डीबीटीची रक्कम मिळण्यासाठी अर्ज प्रशासनाकडे केले. पण जिल्हा परिषदेच्या तिजोरीत पैसाच नसल्याने लाभार्थ्यांना निधीच देऊ शकले नाही. निधी कागदावरच अखर्चितयावर्षी वित्त सभापतींनी ३७ कोटीच्या बजेटमध्ये उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ हा केवळ कागदावरच साधला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अर्थसंकल्पाला अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. जिल्हा परिषदेचे उत्पन्न पाहता हा अर्थसंकल्प अवाजवी असल्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र वित्त सभापतींनी मागील वर्षीचा अर्थसंकल्पाचा आकडा कायम ठेवला. इतकेच नव्हे तर कागदोपत्री अखर्चित असलेल्या निधीचेही पुनर्नियोजन केले. विशेष म्हणजे बजेट हा अवाजवी असल्याने जि.प. प्रशासनाने विभागीय आयुक्त किंवा शासनाकडे याची माहिती देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरfundsनिधी