शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प. शाळांमधील विद्यार्थी यंदाही मुकणार गणवेशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:37 IST

कोव्हिड-१९ मुळे शासनाने अनावश्यक खर्चावर व योजनांवर निर्बंध घातले. त्या अनुषंगाने जि.प. च्या वित्त विभागानेही विभागांना निर्देश दिल्यामुळे, गणवेशासाठी केलेल्या तरतुदीवर निर्बंध येणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून गणवेशापासून वंचित असलेले खुल्या व ओबीसीचे विद्यार्थी यंदाही गणवेशापासून मुकणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जि.प.च्या शाळांमध्ये वर्ग १ ते ८ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश दिला जातो. पण याला खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी अपवाद आहेत. मात्र विद्यार्थिनींच्या बाबतीत सर्वच प्रवर्गातील विद्यार्थिनींना मोफत गणवेश पुरविल्या जातो. खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिल्या जात नसल्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो, ही भूमिका ठेवत जिल्हा परिषदेने यंदाच्या अर्थसंकल्पात गणवेशासाठी ५० लाख रुपयांची तरतूदही केली होती. परंतु कोव्हिड-१९ मुळे शासनाने अनावश्यक खर्चावर व योजनांवर निर्बंध घातले. त्या अनुषंगाने जि.प. च्या वित्त विभागानेही विभागांना निर्देश दिल्यामुळे, गणवेशासाठी केलेल्या तरतुदीवर निर्बंध येणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून गणवेशापासून वंचित असलेले खुल्या व ओबीसीचे विद्यार्थी यंदाही गणवेशापासून मुकणार आहेत.शासनाकडून जि.प.ला मिळणाºया अनुदानामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येण्याची शक्यता असल्यामुळेच सेसफंडातील रकमेतून केवळ कार्यालयीन सादिल खर्चच करा, असे पत्र मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी (कॅफो) काढल्याची माहिती आहे. सदरचे पत्र हे नुकत्याच पार पडलेल्या वित्त समितीच्या सभेतही ठेवले होते. यावेळी वित्त समितीच्या कुठल्याही सदस्यांनी याला विरोध दर्शविला नाही व हा विषय समितीच्या सभेतही मंजूर झाला आहे. जि.प.च्या शाळेत यंदा १६ हजार ओबीसी व खुल्या वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश एससी, एसटी, बीपीएल प्रवर्गातील मुलांना दिले जातात. २०१९-२० या वर्षात जि.प. तत्कालीन वित्त व शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांनी अर्थसंकल्पात गणवेशासाठी २० लाख रुपयांची तरतूद केली होती. पण तो निधी खर्चच होऊ शकला नाही. यंदा विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी वित्त सभापती भारती पाटील यांनी ५० लक्ष रुपयांची तरतूदही केली. परंतु आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाचे आर्थिक स्रोत संकुचित झाल्याने शासनाकडून जि.प.ला प्राप्त होणाऱ्याअनुदानामध्ये कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जि.प.च्या सेसफंडामध्ये प्राप्त होणाऱ्या रकमेपैकी ८० ते ८५ टक्के रक्कम ही शासनाच्या स्रोताद्वारे प्राप्त होते व उर्वरित केवळ १० ते १५ टक्केच उत्पन्न जि.प.च्या स्रोतापासून प्राप्त होते. जि.प.चा सेसफंडाचा अर्थसंकल्प मुख्यत्वे शासन स्रोतावर अवलंबून असल्याने अर्थसंकल्पीय खर्चावर मर्यादा आणण्याच्या सूचना कॅफोंनी केल्या आहेत.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSchoolशाळा