शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

नागपूर जि.प.त २७६ तर पंचायत समितीत ४९७ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:14 IST

र्ज मागे घेण्याच्या दिवशी जि.प.मध्ये १४९ व पंचायत समितीमध्ये १६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिंगणात आता २७६ व पंचायत समितीच्या रिंगणात ४९७ उमेदवार आहेत.

ठळक मुद्देमोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज घेतले मागे : राजकीय पक्षाची डोकेदुखी झाली शांत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. त्यामुळे अधिकृत उमेदवाराबरोबरच राजकीय पक्षांचीही चांगलीच डोकेदुखी वाढली होती. जास्तीत जास्त बंडखोरी टाळण्यासाठी स्थानिक नेतेमंडळीनी जोरकस प्रयत्न केले. अनेक बंडखोर उमेदवारांपुढे आश्वासनांचे इमले बांधले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी शमली आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जि.प.मध्ये १४९ व पंचायत समितीमध्ये १६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिंगणात आता २७६ व पंचायत समितीच्या रिंगणात ४९७ उमेदवार आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ५०० व पंचायत समितीसाठी ७३७ अर्ज दाखल झाले होते. २४ डिसेंबर रोजी या अर्जाची छाननी झाली असता, जि.प. मध्ये १६ व पं.स. मध्ये २६ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे वैध उमेदवारांची संख्या जि.प.मध्ये ४२५ व पं.स. मध्ये ६६६ एवढी होती. जिल्हा परिषदेचे ५८ तर पंचायत समितीचे ११६ सर्कल आहेत. सात वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होत असल्याने, राजकीय पक्षाकडे मोठ्या संख्येने अर्ज आले होते. भाजपाकडे तर जिल्हा परिषदेसाठी ७५० अर्ज आले होते. एकेका सर्कलमधून १०-१० उमेदवार इच्छुक होते. पण यातून ५८ उमेदवारांची निवड करायची होती. त्यामुळे भाजपा असो की काँग्रेस दोन्ही मुख्य राजकीय पक्षाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. प्रत्येक सर्कलमध्ये अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध किमान दोन बंडखोर उभेच ठाकले होते. त्यामुळे अधिकृत उमेदवाराबरोबरच राजकीय पक्षांचीही चिंता वाढली होती. बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता होती. मात्र राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी टाळली. जिल्हा परिषदेत १४९ उमेदवारांनी अर्ज मागे घेणे, हे राजकीय नेत्यांना आलेले यशच मानावे लागेल.तालुकानिहाय अधिकृत उमेदवारतालुका            जि.प.        पंचायत समितीनरखेड            १६             ३५काटोल            १५             ३०कळमेश्वर         १२             २२सावनेर             २५            ४२पारशिवनी        २४            ३५रामटेक            ३५            ५४मौदा                १९             ४४कामठी            २०             ३५नागपूर ग्रामीण २८             ४६हिंगणा            २५             ४८उमरेड            २३             ३८कुही               २४             ४९भिवापूर          १०              १९

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूक