नागपूर जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसच्या रश्मी बर्वे; उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:49 IST2020-01-18T15:48:49+5:302020-01-18T15:49:23+5:30
नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच गटनेते मनोहर कुंभारे यांची अविरोध निवड करण्यात आली.

नागपूर जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसच्या रश्मी बर्वे; उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच गटनेते मनोहर कुंभारे यांची अविरोध निवड करण्यात आली. शनिवारी या निवडीसाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात घेतलेल्या या विशेष बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या विजयी उमेदवारांची घोषणा केली. ८ जानेवारीला जि.प. निवडणुकांचे निकाल हाती आले होते. काँग्रेसने ३० जागा मिळवीत आपले बहुमत सिद्ध केले होते. मात्र या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने राष्ट्रवादीलाही सत्तेच्या समीकरणात सहभागी करून घ्यावे लागले.