शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प. : सहा. शिक्षकाच्या १५५ जागेसाठी हजारो अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:10 IST

नागपूर जि.प. मध्ये १६८ जागेवर पदभरती करण्यात येणार आहे. यात १५५ शिक्षकांचा समावेश आहे. यासाठी गेल्या ४ दिवसांमध्ये १५०० वर अर्ज आले आहे.

ठळक मुद्देजि.प. अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती : आरोग्य विभागातील २ पदासाठी ४०० वर अर्ज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने ११ महिन्यासाठी अधिसंख्य केले आहे. अजूनही शासनाने त्यांच्या आस्थापनेचा व वेतनाचा प्रश्न सोडविलेला नाही. मात्र त्यांच्या झालेल्या रिक्त जागेवर पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. नागपूर जि.प. मध्ये १६८ जागेवर पदभरती करण्यात येणार आहे. यात १५५ शिक्षकांचा समावेश आहे. यासाठी गेल्या ४ दिवसांमध्ये १५०० वर अर्ज आले आहे.आरक्षित वर्गातून शासकीय सेवा मिळविणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. अनुसूचित जमाती वर्गातून सेवा मिळविणारे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. शासनाने या कर्मचाऱ्यांना वारंवार संरक्षण दिले होते. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र नसलेले अधिकारी, कर्मचारी यांना सेवेत कमी करण्याबाबतचा आदेश दिला. या आदेशावर राज्य शासनाने अंमल करताना कर्मचाऱ्यांची सेवा सरसकट बंद न करता त्यांना ११ महिन्याकरिता सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेत १६८ कर्मचारी जात वैधता प्रमाणपत्र सादर करून शकले नाही. यात सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. ११ महिने किंवा सेनानिवृत्तीचा कालावधी यापैकी जे आधी घडेल, तोपर्यंत असणार आहे. शासनाकडून अनुसूचित जमातीच्या वर्गातील रिक्त पदांची भरती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेने १६८ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेत १५५ सहा. शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसात १५०० अर्ज आले आहे. टीईटी अथवा सीटीईटी मध्ये गुणवत्ता ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोबतच जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारांना द्यायचे आहे. मेरिटनुसार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. तर आरोग्य विभागात दोन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ४०० च्या जवळपास अर्ज आले आहे. आरोग्य विभाग पदभरतीसाठी परीक्षा घेणार आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरTeacherशिक्षक