शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

नागपूर जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:44 IST

प्रशासनाची दिशाभूल करून विदेशवारीवर गेलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जारी केले आहेत.

ठळक मुद्देविदेशवारीचा फटका : बांधकाम विभाग टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाची दिशाभूल करून विदेशवारीवर गेलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जारी केले आहेत. गेल्या काही वर्षात एकाच वेळी दहा कर्मचाऱ्यांचे निलंबन होणे ही मोठी कारवाई मानल्या जात आहे. या निलंबनात बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.मार्च एन्डिंगची कामे निपटून पर्यटनाच्या उद्देशातून जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे कर्मचारी विदेशवारीवर गेले होते. यात जवळपास २२ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्या काही सेवानिवृत्त कर्मचारीसुद्धा होते. मात्र सर्वाधिक कर्मचारी हे बांधकाम विभागातील असून, बांधकाम विभागातूनच या दौऱ्याचे नियोजन झाले होते. त्यामुळे येथील शिपाईसुद्धा या दौऱ्यात सहभागी झाले होते. ज्या दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, त्यांनी विदेशात जाण्यासाठी नियमानुसार परवानगी घेतली नव्हती. त्यांचा हा निष्काळजीपणा चांगलाच भोवला.विदेशवारीसंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सीईओंनी गंभीर दखल घेऊन, याप्रकरणी सुरुवातीला दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांचा समावेश असल्याने, चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून त्यांना चौकशीतून काढून जिल्हा आरोग्य अधिकारी व लेखा अधिकारी यांची नियुक्ती केली. समितीने संपूर्ण कर्मचाऱ्यांचे लेखी बयान घेतले. या बयानांची उलट तपासणी केली आणि अहवाल सीईओंना सादर केला.मंगळवारी सकाळी सीईओंनी परवानगी न घेता विदेशवारीवर गेलेल्या १० कर्मचाऱ्यांच्या निलंबनाला मंजुरी देऊन, ती फाईल कारवाईसाठी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता ठाकरे यांच्याकडे पाठविली. यामध्ये जि.प.च्या बांधकाम विभागातील दोन शिपायांसह मुख्य आरेखक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी (अधीक्षक), कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, आरेखक यांच्यासह रामटेक व मौदा उपविभागाचे दोन शाखा अभियंता तसेच सावनेर पंचायत समितीतील एका शाखा अभियंत्याचा यात समावेश आहे.कार्यकारी अभियंत्यांची चुप्पीसीईओंनी निलंबनाची कारवाई मंजूर करून, संबंधित फाईल दुपारी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता ठाकरे कारवाईसाठी पाठविली. ही फाईल कार्यकारी अभियंत्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी काही कारणास्तव कार्यालय सोडले. सायंकाळपर्यंत निलंबनाचे आदेश कर्मचाऱ्यांना मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु कार्यकारी अभियंता न आल्याने आदेश मिळू शकले नाही. कारवाईतील नावे जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंत्यासोबत संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवाया विदेशवारीत मोठ्या संख्येने बांधकाम विभागाचे कर्मचारी असल्याने एकाच वेळी सर्वांना सुट्या कशा मंजूर केल्या? यासंदर्भात त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर