शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषद :अंगणवाडीच्या बांधकाम यादीवरून विरोधकासह अध्यक्षांचेही दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 20:48 IST

जिल्हा नियोजन समितीकडून अंगणवाडीचे बांधकाम व अंगणवाडीतील शौचालयाच्या बांधकामासाठी चार कोटींचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला-बाल कल्याण विभागाने पाठविलेले प्रस्ताव हे कुठल्याही सदस्यांना अथवा जि.प. अध्यक्षाला विचारात न घेता जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला परस्पर पाठविल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य शिवकुमार यादव यांनी केला. त्यांच्या विरोधाला दुजारा देत अध्यक्ष निशा सावरकर यांनी महिला व बाल कल्याणच्या सभापतीसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देसभापतीसह अधिकाऱ्याला केले टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्क      नागपूर : जिल्हा नियोजन समितीकडून अंगणवाडीचे बांधकाम व अंगणवाडीतील शौचालयाच्या बांधकामासाठी चार कोटींचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला-बाल कल्याण विभागाने पाठविलेले प्रस्ताव हे कुठल्याही सदस्यांना अथवा जि.प. अध्यक्षाला विचारात न घेता जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला परस्पर पाठविल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य शिवकुमार यादव यांनी केला. त्यांच्या विरोधाला दुजारा देत अध्यक्ष निशा सावरकर यांनी महिला व बाल कल्याणच्या सभापतीसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.महिला व बाल कल्याणचा महिला मेळावा रद्द करण्यामागे अध्यक्षांचा हात होता, असा रोष समितीच्या सदस्यांमध्ये होता. बजेटच्या सभेत समितीच्या सदस्यांनी सभागृहात रोषही व्यक्त केला. त्यात समितीच्या सदस्यांनी विरोधक शिवकुमार यादव यांच्यावरही रोष व्यक्त केला. त्यामुळे महिला व बाल कल्याण समितीला कमकुवत दाखविण्यासाठी त्यांनी जिल्हा नियोजनमधून महिला व बाल कल्याण विभागाला मिळालेल्या चार कोटींच्या निधीतून अंगणवाडी बांधकाम व शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी सदस्यांना विचारणा केली नाही, अधिकाऱ्यांनी सभापतीच्या स्वाक्षरीने प्रस्ताव परस्पर जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे पाठविले. या मुद्यावरून शिवकुमार यादव यांनी सभापतीसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यात अध्यक्ष निशा सावरकर यांनीही फोडणी दिली. पंचायत समितीमधून मी यादी आणली आहे. त्यात माझी स्वाक्षरी नाही. पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही अध्यक्ष आणि सीईओंची स्वाक्षरी न घेता परस्पर पाठविल्यामुळे अध्यक्षांनी सभापतीसह अधिकाऱ्यांचा चांगलाच पाणउतारा केला. यादीसुद्धा सभागृहात अध्यक्षांनी झळकविली.दरम्यान सभापती पुष्पा वाघाडे यांनी दुसऱ्याच दिवशी अंगणवाडी बांधकामाची यादी मागविली. त्यात त्यांचीही स्वाक्षरी नव्हती. सीईओंच्या स्वाक्षरीनुसार फक्त अंगणवाडी बांधकामाचे प्रस्ताव पाठविले होते. अंगणवाडी शौचालय बांधकामाचे प्रस्ताव अजूनही विभागाकडेच असल्याची माहिती त्यांनी दिली. टार्गेट करण्याचा प्रयत्नबजेटच्या बैठकीत अध्यक्षांनी ज्या पद्धतीने विषय समजून न घेता, सत्य परिस्थिती न बघता, विरोधकाच्या हो ला हो लावत आगपाखड केली. हा प्रकार समितीला, समितीच्या सदस्यांना केवळ टार्गेट करण्याचा होता.पुष्पा वाघाडे, सभापती, महिला व बाल कल्याण समिती

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरnagpurनागपूर