शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नागपूर जिल्हा परिषद : ५३ लाख रुपयाच्या खर्चाचे अध्यक्षाला दिले अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 20:25 IST

जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात पहिल्यांदा संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी ५३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवून त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच निधी खर्च करता येणार होता.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत निर्णय : १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे नियोजन करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात पहिल्यांदा संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी ५३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवून त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच निधी खर्च करता येणार होता. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींसाठी खर्च करता यावा म्हणून निधी खर्चाचे अधिकार जि. प. अध्यक्षांना देण्यात आले. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शासनाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना दिले आहेत. पण हा निधी कुठल्या बाबींवर खर्च करावा यासंदर्भातील नियोजन नसल्याने तो निधी खर्च करताना ग्रामसेवकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जि.प.ने हा निधी कुठल्या बाबींवर खर्च करावा याचे नियोजन करून ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात, अशी मागणी जि.प. सदस्य संजय झाडे यांनी केली. त्याचबरोबर १४ व्या वित्त आयोगाचा निधी कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्याबरोबर गरीब गरजूंना त्यातून धान्य देता येईल, यासंदर्भातही उपाययोजना कराव्यात, असे निर्देश अध्यक्ष बर्वे यांनी पंचायत विभागाला दिले.कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढल्यास अशा रुग्णांसाठी क्वारंटाईनची काय व्यवस्था केली आहे. सध्या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची संख्या वाढली असल्याने डॉक्टरांना पीपीई किट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अनिल निधान यांनी केली. बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी क्लिनिक बंद करून ठेवले आहेत. या डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करून तसेच सरकारी आरोग्य केंद्रात दोन तास द्यावे, अशी विनंती अध्यक्ष बर्वे यांनी डॉक्टरांना केली आहे.आशावर्करला द्यावे थर्मामीटरग्रामीण भागात आशावर्करच्या माध्यमातून कोरोनाचा सर्वे सुरू आहे. त्या फक्त तोंडी विचारत आहेत. अनेक जण कोरोनाच्या भीतीमुळे चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे आशावर्करला थर्मामीटर देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.पाणीटंचाईची बैठक जानेवारीत घ्याजिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आता प्रस्ताव आल्यानंतर त्यावर उपाययोजना कधी होईल? टंचाईची कामे कधी सुरू होतील. दरवर्षी टंचाईची मोठ्या संख्येने कामे अपूर्ण राहतात. हे लक्षात घेता पाणीटंचाईची बैठक जानेवारीत घेण्यात यावी, अशी मागणी संजय झाडे यानी केली.जिल्ह्यासाठी खनिज निधीतून २० लाखाचा निधीजि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी पशु व दुग्धसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी २० लाख रुपयाच्या निधीची मागणी केली होती. यातून मास्क, सॅनिटायझर व निर्जंतुकीकरणासाठी औषधांची फवारणी करायची होती. जिल्हाधिकाऱ्यांनी खनिज प्रतिष्ठानातून २० लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती  कुंभारे यांनी दिली.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरBudgetअर्थसंकल्पcorona virusकोरोना वायरस बातम्या