शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेचा अधिकारी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:20 IST

महिला ग्रामसेविकेला भ्रष्टाचाराच्या चौकशीत क्लीन चिट देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागणारा नागपूर जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सखाराम निंबाळकर (वय ५७) एसीबीच्या सापळ्यात अडकला. शुक्रवारी दुपारी ५० हजारांच्या लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने निंबाळकरला अटक केली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजाआडग्रामसेविकेला क्लीन चिट देण्याची बतावणी : ५० हजारांची लाच मागितली : एसीबीने बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला ग्रामसेविकेला भ्रष्टाचाराच्या चौकशीत क्लीन चिट देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागणारा नागपूर जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सखाराम निंबाळकर (वय ५७) एसीबीच्या सापळ्यात अडकला. शुक्रवारी दुपारी ५० हजारांच्या लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने निंबाळकरला अटक केली.निंबाळकरला एसीबीच्या जाळ्यात अडकवणारी महिला ग्रामसेविका भिवापूर तालुक्यातील चिंचाळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक आहे. त्यांच्याकडे आॅगस्ट २०१६ ते जून २०१७ पर्यंत नांद गट ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार होता. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत साहित्य खरेदी तसेच बांधकामात त्यावेळी नांद गट ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार होती. त्यामुळे सदर महिला ग्रामसेविकेची चौकशी सुरू झाली. भिवापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी तो चौकशी अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी निंबाळकर यांच्याकडे पाठविला. त्यावर काय निर्णय घ्यायचा, याचे अधिकार निंबाळकरांना होते. त्यामुळे ग्रामसेविकेने त्यांच्याशी संपर्क साधला. तुमच्या विरुद्ध कोणतीही कारवाई न करता. क्लीन चिट देऊन हे प्रकरण बंद करतो, त्यासाठी एक लाख रुपयांची लाच द्यावी लागेल, असे निंबाळकर म्हणाला होता. आधी ५० हजार आणि फाईल बंद केल्यानंतर ५० हजार देण्याची मागणी त्याने केली होती. नोकरी वाचविण्यासाठी महिलेने ती मान्य केली अन् सरळ एसीबीत तक्रार नोंदवली. एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या तक्रारीची शहानिशा करून घेतली. त्यात तथ्य असल्याचे पटल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले.भंडारा चमूने केली कारवाईनिंबाळकर खाबूगिरीसह अन्य काही प्रकरणामुळे जिल्हा परिषद वर्तुळात नेहमी चर्चेत होते. त्यांचे वरिष्ठ पातळीवर प्रभावी हितसंबंध असल्याचे माहीत असल्याने सापळा कारवाईची माहिती लिक होण्याचा धोका होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस अधीक्षक पाटील यांनी निंबाळकरला जेरबंद करण्याची जबाबदारी भंडारा एसीबीचे उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्यावर सोपविली. त्यानुसार, एसीबी पथकाने जिल्हा परिषद परिसरात कारवाईची तयारी केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदार महिला लाचेचे ५० हजार रुपये घेऊन शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास निंबाळकरकडे गेल्या. त्याने बराच वेळ त्यांना तेथे बसवून ठेवले..

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागzpजिल्हा परिषद