शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ऑनलाईन सर्व्हिस बुक करण्यात नागपूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 20:25 IST

शासकीय कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक ऑनलाईन करण्यात येत आहे. याची सुरुवात नागपूर जिल्हा परिषदेने केली होती. आतापर्यंत पडताळणीची ९९ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, संपूर्ण कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक आता ऑनलाईन झाले आहे.

ठळक मुद्देनागपुरातूनच झाली होती सुरुवात : ९९ टक्के पडताळणी पूर्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक ऑनलाईन करण्यात येत आहे. याची सुरुवात नागपूर जिल्हा परिषदेने केली होती. आतापर्यंत पडताळणीची ९९ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, संपूर्ण कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक आता ऑनलाईन झाले आहे.सरकारी कर्मचारी म्हणून रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंतची सगळी माहिती देणारी गोष्ट म्हणजे ‘सर्व्हिस बुक’ आहे. अनेकवर्षे त्यात नोंदी होत राहतात आणि अनेकदा सर्व्हिस बुकची परिस्थिती जुन्या पोथ्यांसारखी होते. केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली ऑनलाईन केल्या आहेत. यात निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली ऑनलाईन केल्या जात आहेत. आता ‘सर्व्हिस बुक’सुद्धा ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर जिल्हा परिषदेने सर्वप्रथम हे काम हाती घेतले. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवेचा रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प आता राज्यभर राबविला जात आहे. सर्वच जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक आता ऑनलाईन होत आहे. यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन भरली जात आहे. नागपूर जिल्हा परिषदेत एकूण ७९९१ कर्मचारी आहेत. यातील ७९४१ कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन सर्व्हिस बुक सुरू झाले आहे. यातील ७९१६ कर्मचाऱ्यांचे ‘सर्व्हिस बुक’ची पडताळणीसुद्धा झालेली आहे. नागपूर जिल्हा परिषदेतील ९९.०६ टक्के पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पडताळणी प्रक्रियेत नागपूर प्रथम क्रमांकावर आहे. ७ कर्मचाऱ्यांच्या ‘सर्व्हिस बुक’ची पडताळणी शिल्लक असून ६८ कर्मचाऱ्यांची माहिती अद्याप ऑनलाईन झालेली नाही. नागपूर खालोखाल नाशिक जिल्हा परिषदेत पडताळणीची टक्केवारी ९८.६२ टक्के इतकी आहे. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण १६८८६ कर्मचारी असून त्यातील १६८८१ कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन सर्व्हिस बुक सुरू झाले आहे. मात्र पडताळणी प्रक्रियेत नाशिक नागपूरपेक्षा किंचित मागे आहे. त्या खालोखाल जळगाव आणि अहमदनगर या जिल्हा परिषदेचा क्रमांक आहे. राज्यात पालघर जिल्हा परिषदेतील हे काम फारच संथगतीने सुरू आहे. तेथील पडताळणी प्रक्रियेची टक्केवारी केवळ ०.०२ इतकी आहे. २१ टक्के प्रक्रिया पूर्णराज्यातील जिल्हा परिषदांममध्ये एकूण २,८५,९८० कर्मचारी आहेत. त्यातील १,८४,५३१ कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन सर्व्हिस बुक सुरू झाले आहे. त्यातील ६०,२६१ कर्मचाऱ्यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण झाली आहे. ४९४३ कर्मचाऱ्यांची पडताळणी प्रक्रिया प्रलंबित आहे. २,२१,००१ कर्मचाऱ्यांची पूर्ण माहितीच भरण्यात आलेली नाही.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरonlineऑनलाइन