नागपूर जिल्हा परिषद : भ्रष्टाचारामुळे वाढले कुपोषणाचे प्रमाण : विरोधकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 11:21 PM2020-10-02T23:21:15+5:302020-10-02T23:22:48+5:30

Malnutrition, Corruption, Nagpur News जिल्ह्यात जून महिन्यात कुपोषित बालकांची संख्या ८४८ होती. सप्टेंंबरमध्ये त्यात वाढ होऊन १८४६ झाली. असे असतानाही जिल्ह्यातील कुपोषणाच्या बाबतीत ना प्रशासन गंभीर आहे ना सभापती. महिला बाल कल्याण विभागामार्फत बालकांना पुरविण्यात येणाऱ्या आहारामध्ये भ्रष्टाचार होत असल्याने जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Nagpur Zilla Parishad: Corruption raises malnutrition: Opposition alleges | नागपूर जिल्हा परिषद : भ्रष्टाचारामुळे वाढले कुपोषणाचे प्रमाण : विरोधकांचा आरोप

नागपूर जिल्हा परिषद : भ्रष्टाचारामुळे वाढले कुपोषणाचे प्रमाण : विरोधकांचा आरोप

Next
ठळक मुद्देसभापतींचेही दूर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात जून महिन्यात कुपोषित बालकांची संख्या ८४८ होती. सप्टेंंबरमध्ये त्यात वाढ होऊन १८४६ झाली. असे असतानाही जिल्ह्यातील कुपोषणाच्या बाबतीत ना प्रशासन गंभीर आहे ना सभापती. महिला बाल कल्याण विभागामार्फत बालकांना पुरविण्यात येणाऱ्या आहारामध्ये भ्रष्टाचार होत असल्याने जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
कुपोषण मुक्तीकरिता राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अनिल निधान म्हणाले, राज्यात व नागपूर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतरण झाले. सोबतच कोरोनाचेही संकट आले आदी सर्व बाबींमुळे या मुलांना मार्च महिन्यापासून बालकांना कडधान्याच्या रूपात पोषण आहार येत आहे. यात चणा डाळ, मसूर डाळ, तिखट, हळद, तेल, गहू आदींचा समावेश आहे. पूर्वी अंगणवाडीत शिजलेला आहार येत होता. अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना तो दिला जात होता. पण मार्चपासून अंगणवाडी बंद असल्याने कडधान्य येत आहे. हे कडधान्य पुरविण्याचे कंत्राट राज्य सरकारमधील एका बड्या नेत्याच्या परिचित व्यक्तीला देण्यात आले आहे. त्यांच्याकडून या बालकांना पुरविण्यात येणारा आहार (कडधान्य) फार निकृष्ट दर्जाचा आहे. हा सर्व प्रकार जि.प.तील अधिकारी/पदाधिकाऱ्यांना माहिती असतानादेखील त्यांचे याकडे साफपणे दुर्लक्ष दिसून येत आहे. यात कुठेतरी भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप निधान यांनी केला.

Web Title: Nagpur Zilla Parishad: Corruption raises malnutrition: Opposition alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.