शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नागपुरात  रॉकेल टाकून तरुणाला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 13:59 IST

लुटमारी करणाऱ्या तिघांनी विरोध केला म्हणून एका तरुणाच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंतच पेटवून दिले. कामठी मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शनिवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचे नाव इस्माईल अब्दुल मन्नान कुरेशी (वय २४) आहे. तो यशोधरानगरातील एनआयटी क्वॉर्टरजवळ राहतो. सध्या तो मेयोत मृत्यूशी झुंज देत आहे.

ठळक मुद्देकळमन्यात लुटमारी करणाऱ्यांचे कृत्य , आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लुटमारी करणाऱ्या तिघांनी विरोध केला म्हणून एका तरुणाच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंतच पेटवून दिले. कामठी मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शनिवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचे नाव इस्माईल अब्दुल मन्नान कुरेशी (वय २४) आहे. तो यशोधरानगरातील एनआयटी क्वॉर्टरजवळ राहतो. सध्या तो मेयोत मृत्यूशी झुंज देत आहे.कळमना गावाजवळच्या जुना कामठी रोडवर रिलायन्स पेट्रोल पंप आहे. तेथून शुक्रवारी मध्यरात्री इस्माईल रस्त्याने पायी जात होता. त्याला एका आरोपीने रोखले. ‘तुम्हारे पास कितने पैसे है, असे त्याने विचारले. इस्माईलने मेरे पास पैसे नही’, असे म्हटले असता आरोपीने त्याच्या खिशात जबरदस्तीने हात घातला. तो रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे इस्माईलने त्याचा प्रतिकार केला.यामुळे या दोघांत हाणामारी झाली. ते पाहून आरोपींचे दोन साथीदार अंधारातून आले. त्यांनी इस्माईलच्या अंगावर रॉकेल ओतून माचिसची जळती काडी फेकली. त्यामुळे इस्माईलच्या अंगावरील कपड्याने पेट घेतला. त्याची छाती, दोन्ही हात पाय, मांड्या, पोट आणि पाठ गंभीररीत्या जळाली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी इस्माईलला विझवून पोलिसांना कळवले. गंभीर जखमी झालेल्या इस्माईलला मेयोत दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या बयानावरून कळमना पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर