शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

Nagpur: तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी..., दीक्षाभूमीवर जयबुद्ध, जयभीमचा जयघोष

By सुमेध वाघमार | Updated: October 12, 2024 19:35 IST

Nagpur: ६८व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्याने त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो मैलावरु न लाखोंच्या संख्येने अनुयायी आले होते. जय बुद्ध व जयभीम या एकाच जयघोषाने दीक्षाभूमीचा परिसर दुमदुमला होता.

- सुमेध वाघमारेनागपूर  -  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. हजारो वर्षे दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. नागपूरच्यादीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतीदर्शी कार्य पूर्ण केले. ६८व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्याने त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो मैलावरु न लाखोंच्या संख्येने अनुयायी आले होते. जय बुद्ध व जयभीम या एकाच जयघोषाने दीक्षाभूमीचा परिसर दुमदुमला होता.

हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे हे देशाच्या कानाकोपºयातूनच नव्हे तर नेपाळ, थायलॅण्ड, जापान, श्रीलंका येथूनही दीक्षाभूमीवर आले होते.  लाखो अनुयायांच्या गर्दीने दीक्षाभूमी फुलून गेली होती. युवकांच्या झुंडीच्या झुंडी ‘जयभीम’चा नारा देत गर्दीत शामील होत होती. गर्दी अफाट असली तरी सर्वच एकमेकांना सांभाळून घेत होते.

पवित्र अस्थिंच्या दर्शनासाठी लागल्या रांगादीक्षाभूमी येथील स्तुपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला कलश दर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. या पवित्र अस्थिंचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांची रांग लागली होती.  दीक्षाभूमी परिसरातील बोधी वृक्षाला आकर्षक रोषणाईने सजविले होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील दीक्षाभूमीचा परिसर तेजाने न्हावून निघाला होता. समता सैनिक दलाचे सैनिक आपली सेवा व सुरक्षा पुरविताना दिसून आले. लाखोंच्या संख्येने येणाºया अनुयायांसाठी हजारावर  संघटना सरसावल्या होत्या. पाण्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था त्यांनी केली होती.

वस्त्या-वस्तांमधून निघाली रॅलीनागपूरच्या विविध वस्त्यांमध्ये ‘भीम रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. दुपारी निघालेली रॅली सायंकाळी दीक्षाभूमीवर पोहचताच एकच जल्लोष होत होता. पांढºया वस्त्रातील अनुयायी ‘जयभीम’च्या जयघोषात एकमेकांना शुभेच्छा देत होते. इंदोरा, टाकळी सीम, नारा, बेझनबाग, अंबाझरी, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, चंदननगर, जाटतरोडी, चंद्रमणीनगर, नवीन बाभूळखेडा, मानेवाडा, दिघोरी या सारख्या कितीतरी वस्त्यांमधून  रॅली निघाल्या.

टॅग्स :nagpurनागपूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी