शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुख्यात गुंडाकडून तरुणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 21:07 IST

दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचे केस धरून तिला खाली ओढून मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराने नंतर तिच्या भावावर प्राणघातक हल्ला चढवला. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ट्रस्ट ले-आऊटमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देभावावर प्राणघातक हल्ला : अंबाझरीत गुन्हा, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचे केस धरून तिला खाली ओढून मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराने नंतर तिच्या भावावर प्राणघातक हल्ला चढवला. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ट्रस्ट ले-आऊटमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.तरुणीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास दुचाकीने आपल्या घरी जात असताना तिच्या घराजवळ राहणारा सतीश ताराचंद चन्ने (वय ३०) हा कुख्यात गुंड अचानक दुचाकीसमोर आला. दुचाकी वेगात असल्यामुळे त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणीने त्याला कट मारला. त्यामुळे संतापलेल्या आरोपी सतीश चन्ने याने तिचे केस ओढले आणि अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर तिला मारहाण करून तिचा विनयभंगही केला. तरुणीने घरी जाऊन आपल्या भावाला ही बाब सांगितली. तरुणीचा भाऊ आरोपी सतीशला जाब विचारायला आला असता आरोपी सतीशने तरुणीच्या भावालाही मारहाण केली. आरोपीचा साथीदार देवानंद श्रावण शिरसाठ आणि अन्य एकाने तरुणीच्या भावाला खाली पडून त्याला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. तरुणीने भावाची मदत करून कसेबसे त्याला आरोपींच्या तावडीतून सोडविले. दरम्यान, प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीच्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे ट्रस्ट ले-आऊट परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी आरोपी सतीश तसेच देवानंद शिरसाठ या दोघांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.आरोपीवर शंभराहून अधिक गुन्हे दाखलआरोपी सतीश चन्ने हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर लहान-मोठे तब्बल १०५ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला असून त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग