शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील अपघातात नागपूरची महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 21:59 IST

गोवा येथे खासगी बसने भीषण धडक दिल्यामुळे नागपुरातील महिला पर्यटक जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास जुन्या मांडवी पुलाजवळ घडली.

ठळक मुद्देखासगी बसने उडवले : जुन्या मांडवी पुलावरील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : गोवा येथे खासगी बसने भीषण धडक दिल्यामुळे नागपुरातील महिला पर्यटक जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास जुन्या मांडवी पुलाजवळ घडली. स्नेहल दाभाळे (२८) असे मयत महिलेचे नाव असून त्या गुरुनानक ले-आऊट, वैशालीनगर, डिगडोह, हिंगणा रोड येथील रहिवासी होत्या. पोलिसांनी बसचालक दामोदर गावस (वय ६०, रा. चिंबल, पणजी) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल या होंडा अ‍ॅक्टिव्हा (जीए ०३ एन ६६९४) दुचाकीने म्हापशाहून पणजीकडे जात होत्या. दरम्यान, माऊली शांतादुर्गा (जीए ०७ एफ ५०७७) या बसने त्यांना मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे स्नेहल रस्त्यावर फेकल्या गेल्या व त्यांचे डोके चिरडल्या गेले. ते दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. रस्त्यावर रक्ताचे थारोळे साचले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्ता धुवून स्वच्छ केला. अपघात पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी हळहळ व्यक्त केली. समाजमाध्यमांवरील छायाचित्रे पाहूनही लोकांनी दु:ख व्यक्त केले.सकाळी गर्दीची वेळसकाळी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक नोकरी-धंद्यानिमित्त राजधानी पणजीत येत असतात. त्या वेळेस पुलावर खूप गर्दी असते. वाहनांचा पूर वाहत असतो. या गर्दीत हा अपघात झाला. त्यामुळे वाहतुकीवर काही वेळ परिणाम झाला.गाडी भाड्याची, हेल्मेट नाहीगोव्यात पर्यटकांना दुचाकी भाड्याने दिल्या जातात. ‘रेंट अ बाईक’ म्हणून हा व्यवसाय परिचित आहे. स्नेहल यांच्याकडे भाड्याची दुचाकी होती. अपघात घडला तेव्हा स्नेहल यांनी हेल्मेट घातले नव्हते, असा पोलिसांचा अंदाज आहे. ‘रेंट अ बाईक’च्या मालकाचा शोध सुरू आहे.चेहरा ओळखणे अशक्यस्नेहल गोव्यात कुठे राहत होत्या व त्यांच्यासोबत आणखी कोण आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यांच्या पतीशीसुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण चेहरा चिरडल्या गेल्याने तो ओळखता येत नाही. त्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्नेहल यांच्या शरीराच्या अन्य भागावर कुठेही गंभीर दुखापत झाली नाही.

टॅग्स :AccidentअपघातgoaगोवाWomenमहिलाDeathमृत्यू