शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हिवाळी अधिवेशन- पहिल्याच दिवशी विधानभवनात विरोधक- सत्ताधाऱ्यांचा गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 12:01 IST

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात तसंच विधानभवनाच्या बाहेर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळतो आहे.

ठळक मुद्देअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात तसंच विधानभवनाच्या बाहेर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळतो आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांसारख्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत.

नागपूर- नागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात तसंच विधानभवनाच्या बाहेर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळतो आहे.  शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांसारख्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. सोमवारी सकाळी विधानभवनाचं कामकाज सुरू होण्याच्या आधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है! अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्यानंतर अधिवेशनाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीवर चर्चा घ्यावी  व बोंडअळीने पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर विधानभवनात जोरदार गदारोळ सुरू झाला. विखे-पाटील यांनी सोबत 100 रूपयांचा स्टॅम्प पेपर आणला होता. सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेमध्ये 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, हे मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना बोंडअळी ने नुकसान झालेले कापसाचे बोंडाचं असलेले पाकीट सोपवले व हात जोडत मदत जाहीर करण्याची मागणी केली

त्यानंतर विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनीही सडेतोड उत्तर दिलं. 1 हजारच्या स्टॅम्प पेपर वर लिहून देतो 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारच्या कर्जमाफीत विदर्भाला जेवढे पैसे मिळाले तेवढे आम्ही एकट्या बुलढाणा जिल्ह्याला दिले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे. विरोधकांचे हे मगरमछ के आसू आहेत. जेव्हा या मुद्द्यावर चर्चा करू तेव्हा दूध का दूध.. पानी का पानी करून दाखवू असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलं. 

दरम्यान, विधाभवनात विरोधकांचा गोंधळ सुरु असून गदारोळातच सरकार ने कामकाज पुढे रेटले आहे विरोधकांनी सभात्याग केला आहे. 

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील