नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; ‘या’ चिमुकलीला मुख्यमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:48 IST2019-12-20T12:47:32+5:302019-12-20T12:48:02+5:30
आई शेतमजुरी करते.. वडील नाहीत अशा स्थितीत धाकट्या भावासह शिक्षण घेण्यासाठी धडपडत असलेल्या तेजस्विनी सातव या सातव्या वर्गातील मुलीने आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी अकोल्याहून थेट नागपूरचे विधानभवन गाठले.

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; ‘या’ चिमुकलीला मुख्यमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा
वर्षा बाशू/ राजेश टिकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आई शेतमजुरी करते.. वडील नाहीत अशा स्थितीत धाकट्या भावासह शिक्षण घेण्यासाठी धडपडत असलेल्या तेजस्विनी सातव या सातव्या वर्गातील मुलीने आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी अकोल्याहून थेट नागपूरचे विधानभवन गाठले. आपल्या मागणीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काढलेले रेखाचित्रही त्यांना भेट देण्यासाठी सोबत आणले आहे.
नावाप्रमाणेच तेजस्वी स्वभावाच्या तेजस्विनीने आपण शिक्षण घेण्यासाठी ही धडपड करीत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र् यांचे काढलेले रेखाचित्र हे लोकमतच्या अंकात पाहूनच आपण काढल्याचे तिने यावेळी सांगितले. याआधीही आपण अशी रेखाचित्रे काढल्याचे सांगितले. यात तिने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, बाळासाहेब ठाकरे आदींची रेखाचित्रे काढली होती.
तिची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी अद्याप भेट झालेली नाही. मात्र ती विधानभवन परिसरात त्यांच्या भेटीसाठी मोठ्या उमेदीने तिष्ठत उभी आहे.