शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपुरात ६७ वर्षांत पाचपटींनी मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:19 AM

लोकसभा निवडणुकांचा शंखनाद झाला असून, निवडणूक आयोगासोबतच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून मतदानवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा प्रथमच मतदारांचा आकडा हा २० लाखांच्या पार गेला आहे.

ठळक मुद्देसाडेतीन लाखांपासून झाली होती सुरुवात१९८९, १९९६ मध्ये सर्वाधिक वाढ

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांचा शंखनाद झाला असून, निवडणूक आयोगासोबतच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून मतदानवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा प्रथमच मतदारांचा आकडा हा २० लाखांच्या पार गेला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाची परंपरा १९५२ सालापासून असून, मतदारांची संख्या सातत्याने वाढतच गेल्याचे दिसून आले. मागील ६७ वर्षांमध्ये मतदारसंघात मतदारांची संख्या ही साडेसतरा लाखांहून अधिक संख्येने वाढली आहे.१९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका विदर्भ प्रदेश, मध्य प्रांत आणि बेरार प्रांत असताना झाल्या. त्यावेळी विदर्भात लोकसभेचे आठ मतदारसंघ होते. यातील नागपूर हा मोठ्या मतदारसंघापैकी होता. यात नागपूरसह उमरेड व कामठी यांचादेखील समावेश होता. नागपूर लोकसभा क्षेत्राची एकूण मतदारसंख्या ही ३ लाख ५२ हजार ८७० इतकी होती. १९५७ साली एकूण मतदारांमध्ये केवळ २१ हजारांनी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मोहीम व्यापक करण्यास सुरुवात केली.१९८४ मध्ये मतदारसंख्या ८ लाख ४५ हजार ८०५ इतकी होती. त्यानंतरच्या पाच वर्षांतच १९८९ मध्ये यात ३ लाख ३७ हजार ८६७ इतकी वाढ झाली व मतदारांची संख्या ११ लाख ८३ हजार ६७२ वर पोहोचली. ३७ वर्षांनी मतदारसंख्या तेव्हा प्रथमच १० लाखांच्या पार गेली होती.१९९६ मध्ये परत मतदारसंख्येत वाढ दिसून आली. १९९१ च्या तुलनेत मतदारांची संख्या २ लाख ७३ हजार ९५४ वाढली.१९९९ साली मतदारांचा आकडा १५ लाखांच्या वर गेला. २०१४ मध्ये नागपुरात १९ लाख ७८४ मतदार होते, तर यंदा हाती आलेल्या आकडेवारीनुसार मतदारांची संख्या २१ लाख २६ हजार ५०८ इतकी आहे.

पाच वर्षांत दीड लाखांहून अधिक मतदार वाढलेनागपूर लोकसभा मतदारसंघाची मतदारसंख्या २१ लाख २६ हजार ५०८ आहे. मागील लोकसभा निवडणुकीत १९ लाख ५३ हजार २६६ मतदारसंख्या होती. मागील लोकसभेच्या तुलनेत १ लाख ७३ हजार २४२ मतदारांची भर पडली आहे. यात १० लाख ८० हजार ५७४ पुरुष व १० लाख ४५ हजार ९३४ महिला मतदार आहेत. ६६ तृतीयपंथी आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक