शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ भरणार ९० कंत्राटी प्राध्यापक; प्रत्येक महिन्याला मिळणार ४० हजार रुपये वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:11 IST

Nagpur : विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा कंत्राटी प्राध्यापकांच्या भरतीकडे वाटचाल करीत आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ९० पेक्षा अधिक कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. मंजूर झालेल्या ९२ नियमित प्राध्यापकांच्या जागा भरण्यास विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरल्याने ही वेळ आल्याचे बोलले जात आहे.

विद्यापीठात पस्तीसहून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यापैकी बऱ्याच विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. महत्त्वाचे म्हणजे, बऱ्याच विभागांमध्ये दहा ते पंधरा प्राध्यापक कंत्राटी म्हणून काम करताना दिसून येतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि बॅरि. एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयात सर्वाधिक कंत्राटी प्राध्यापकांचा समावेश आहे. इतरही महाविद्यालयांत स्थिती सारखीच आहे. सत्रांत परीक्षा पद्धतीने दोन सत्रांसाठी प्राध्यापकांना नियुक्त करण्यात येते. या प्राध्यापकांना तासिकेप्रमाणेच वेतनही दिले जाते. मात्र, तासिका संपताच प्राध्यापक विभाग सोडून निघून जातात. विद्यापीठामध्ये ९२ प्राध्यापकांची पदे मंजूर झाली होती. मात्र, मधल्या काळात दिवंगत कुलगुरू डॉ. चौधरी निलंबित झाल्याने पदभरती रखडली. तर पुढे एलआयटी विद्यापीठामधून वेगळी झाल्याने प्राध्यापक भरतीच्या बिंदुनामावलीचा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, वर्षभरापासून नियमित प्राध्यापकांची पदभरती करण्यास विद्यापीठ अकार्यक्षम ठरले. त्यामुळे पुन्हा एकदा कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्याची वेळ आली आहे. कंत्राटी प्राध्यापकांना पूर्णवेळ काम आणि सहायक प्राध्यापकांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे प्राध्यापकांची विभाग आणि महाविद्यालयाप्रति जबाबदारी निश्चित करण्यात येईल. यासाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याला ४० हजार रुपये वेतन दिले जाणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरTeachers Recruitmentशिक्षकभरती