शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : १५ ऑगस्टपर्यंत होणार कुलगुरूंची निवड ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 22:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीकडे या पदासाठी जवळपास १२५ अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना जुलै महिन्यातच सादरीकरणाची संधी मिळण्याची शक्यता असून १५ऑगस्टपर्यंत कुलगुरूंची निवड होईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देनिवड समितीकडून छाननी प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीकडे या पदासाठी जवळपास १२५ अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना जुलै महिन्यातच सादरीकरणाची संधी मिळण्याची शक्यता असून १५ऑगस्टपर्यंत कुलगुरूंची निवड होईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहे.डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त झाले होते. त्याअगोदरच मार्च महिन्यात निवड समितीने कुलगुरू पदासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले होते. २० एप्रिलपर्यंत त्यांना अर्ज पाठवायचे होते. परंतु ‘कोरोना’मुळे ‘लॉकडाऊन’ लागला आणि ही प्रक्रियेचा वेग मंदावला. त्यानंतर १५ जूनपर्यंत इच्छुकांना मुदतवाढ देण्यात आली होती. निवड समितीकडे अर्ज पोहोचले असून त्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. सुमारे १२५ अर्ज पोहोचले असून समिती सदस्य ‘ऑनलाईन’ माध्यमातून बैठका करत आहेत.छाननी प्रक्रिया आटोपल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल व त्यांना सादरीकरणासाठी बोलविण्यात येईल. हे सादरीकरण प्रत्यक्ष होईल की ‘ऑनलाईन’ याबाबत समिती निर्णय करणार आहे. सर्वसाधारणत: २० ते २५ उमेदवारांचा यात समावेश असू शकतो. जुलै महिन्याच्या अखेरीसपर्यंत हे सादरीकरण होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या उमेदवारांचे सादरीकरण झाल्यानंतर यातून पाच अंतिम उमेदवारांची निवड करण्यात येईल व त्यांची मुलाखत घेण्यात येईल.निवड समितीत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले, आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांचा समावेश असून ‘आयआयटी-मुंबई’चे कुलसचिव डॉ.आर. प्रेमकुमार हे ‘नोडल’ अधिकारी आहेत. मुलाखती नेमक्या कधी होऊ शकतील यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ.आ.प्रेमकुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ