शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

नागपूर विद्यापीठ; कुलसचिवपदाचा ‘सस्पेन्स’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:29 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे.

ठळक मुद्देविलंब होण्याचे नेमके कारण तरी काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झालेली निवड बदलण्यासाठी प्रशासनावर दबाव येत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी मौन साधले आहे. त्यामुळे घोषणेला विलंब होण्याचे नेमके कारण तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नियोजित वेळापत्रकानुसार शनिवारी कुलसचिवपदासाठी तर रविवारी परीक्षा व मूल्यमापन विभाग संचालकपदासाठी मुलाखती झाल्या. दोन्ही मुलाखतींसाठी वेगवेगळी निवड समिती होती व दोन्ही समितींनी योग्य उमेदवाराच्या नावावर मोहोरदेखील लावली. या मुलाखतींनंतर लगेच घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु कुलसचिवपदाच्या निवडीवरून राजकारण आडवे आले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंतदेखील घोषणा झाली नव्हती. मंगळवारी विद्यापीठाला सुटी आहे. त्यामुळे थेट बुधवारीच ही घोषणा होऊ शकते. राजकीय दबाव लक्षात घेता, राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतरदेखील घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची महिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विद्यापीठातील सर्वच अधिकाऱ्यांनी यासंदर्भात मौन साधले आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.कुलसचिवपदासाठी ३२ उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यानंतर अर्जाची छाननी करून २३ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले. यापैकी सातच उमेदवारांनी हजेरी लावली. यात प्रभारी कुलसचिव व ‘एलआयटी’चे प्रोफेसर डॉ. नीरज खटी, विद्वत परिषदेचे सदस्य डॉ. संजय दुधे, डॉ. चौधरी, डॉ. दोंतुलवार, डॉ. नंदनवार यांचा प्रामुख्याने समावेश होता. तर रविवारी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकांच्या निवडीसाठी १० उमेदवार यासाठी पात्र होते. यात डॉ. बी.आर. महाजन, डॉ. अनिल हिरेखण, डॉ. पी.एम. साबळे, डॉ. एस.व्ही. दडवे, डॉ. ए.जे. लोबो, डॉ. ए.एम. धापडे, डॉ. फुलारी, डॉ. आर.के. ठोंबरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

सात महिन्यांपासून प्रक्रिया सुरूमाजी कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांच्या कुलसचिवपदी कुणीच पूर्णवेळ अधिकारी नव्हते. डॉ. नीरज खटी यांच्याकडे कुलसचिव पदाची प्रभारी जबाबदारी देण्यात आली. डॉ. मेश्राम यांनी न्यायालयात धाव घेतल्याने जाहिरातदेखील काढण्यास उशीर झाला. फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष जाहिरात काढण्यात आली. त्यानंतर अर्ज बोलविणे, अर्जांची छाननी इत्यादी प्रक्रिया झाली. सात महिने उलटून गेल्यानंतरदेखील पदावर नियुक्ती झालेली नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ