शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

कुलसचिवपदी कायम राहण्यासाठी पूरणचंद्र मेश्राम हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:34 IST

वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत (३० जून २०२० किंवा २५ मे २०२० पर्यंत) कुलसचिवपदी कायम राहण्यासाठी पूरणचंद्र मेश्राम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअर्ज दाखल : प्रकरणावर सोमवारी होऊ शकते सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत (३० जून २०२० किंवा २५ मे २०२० पर्यंत) कुलसचिवपदी कायम राहण्यासाठी पूरणचंद्र मेश्राम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.वित्त व लेखा अधिकारी पदाकरिता ३० मे २०१४ पासून व कुलसचिव पदाकरिता २५ मे २०१५ पासून ३७,४००-६७,००० वेतनश्रेणी व १० हजार रुपये ग्रेड पे मिळावा आणि १२ आॅगस्ट २००९ रोजीच्या शासन निर्णयानुसार इतर सर्व लाभ मिळावेत, यासाठी मेश्राम यांनी २०१६ मध्ये उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ती याचिका अद्यापही प्रलंबित आहे. त्या याचिकेत २२ मार्च २०१६ रोजीच्या एका आदेशावर स्थगितीही मागण्यात आली आहे. तो आदेश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतनश्रेणी व सेवानिवृत्ती वयाच्या बाबतीत भेदभाव करणारा असल्याचे मेश्राम यांचे म्हणणे आहे. ही याचिका प्रलंबित असताना मेश्राम यांना ७ आॅगस्ट २०१७ रोजी सेवानिवृत्तीची नोटीस देण्यात आली होती. त्याद्वारे त्यांना कुलसचिव पदावरून वयाच्या ५८ व्या वर्षी म्हणजे, येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होण्यास सांगण्यात आले. परिणामी, मेश्राम यांनी या नोटीसला आव्हान देण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी मागितली. ९ आॅक्टोबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने त्यांना याचिका दुरुस्तीची परवानगी दिली. त्यानंतर २८ मार्च २०१८ रोजी राज्य सरकारने मेश्राम यांना सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ देण्यास मनाई केली. यातच सेवानिवृत्तीचा दिवस जवळ आल्यामुळे हे प्रकरण लवकर निकाली काढण्यात यावे, असा विनंती अर्ज मेश्राम यांनी न्यायालयात दाखल केला होता. १८ जून २०१८ रोजी न्यायालयाने तो अर्ज खारीज केला. या परिस्थितीत मेश्राम यांना येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे. परिणामी, त्यांनी कुलसचिव पदावर कायम राहण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्जात विविध मुद्दे नमूद करून यासंदर्भात सरकारला आवश्यक आदेश देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. न्यायालयात मेश्राम यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर बाजू मांडतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ