शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ: ‘रिसर्च सेल’सोबत होणार केवळ फायलींचा ‘खेळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 07:45 IST

Nagpur News नागपूर विद्यापीठ-संलग्नित महाविद्यालयात प्राध्यापकांचा अनुशेष व ६४ टक्क्याहून अधिक महाविद्यालयात प्राचार्य नसल्याने आयोगाच्या निर्देशाचे पालन होणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे६४ टक्के महाविद्यालयात प्राचार्यच नाहीयूजीसीच्या निर्देशांचे पालन करणार कसे?

योगेश पांडे

नागपूर : देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये संशोधनाचा दर्जा वाढावा व विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थी संशोधनाकडे वळावेत, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने पावले उचलली आहेत. याअंतर्गत विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवर ‘आरडीसी’ (रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट सेल) स्थापन करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. मात्र नागपूर विद्यापीठ-संलग्नित महाविद्यालयात प्राध्यापकांचा अनुशेष व ६४ टक्क्याहून अधिक महाविद्यालयात प्राचार्य नसल्याने आयोगाच्या निर्देशाचे पालन होणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘रिसर्च सेल’ची ही संकल्पना केवळ फायलींचा खेळ ठरू नये, अशी शंकादेखील व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आधार घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने हे निर्देश जारी केले आहेत. शिक्षण धोरणानुसार उच्च शिक्षणात संशोधनाचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. या अनुषंगाने उच्च शिक्षण संस्थांमध्ये रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट सेल स्थापन करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. या माध्यमातून संशोधन वाढेल व विविध सामाजिक समस्यांचेदेखील समाधान समोर येईल, अशी आयोगाची भूमिका आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी यासंदर्भात महाविद्यालयांना योग्य निर्देश जारी करावे व महाविद्यालयातील प्राचार्यांनी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. ‘युनिव्हर्सिटी ॲक्टिव्हिटी मॉनिटरिंग पोर्टल’वर याबाबत केलेली अंमलबजावणी अपलोड करायची आहे. नागपूर विद्यापीठात ५११ प्राचार्य पदांपैकी १८२ भरलेली असून, उर्वरित ३२९ पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत ‘रिसर्च सेल’ची स्थापना व त्यावर निरंतर लक्ष कसे काय ठेवले जाणार तसेच त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘रिसर्च गव्हर्नन्स’ काम करणार कसे?

‘आरडीसी’चे एकूण व्यवस्थापन व प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी संशोधन सल्लागार परिषदेकडे राहणार आहे. या परिषदेत विद्यापीठ पातळीवरील संस्थांमध्ये कुलगुरू तर महाविद्यालयीनस्तरावर प्राचार्य किंवा त्यांचे नामनिर्देशित प्रतिनिधी राहतील. याशिवाय ‘आरडीसी’अंतर्गत विविध समित्यादेखील स्थापन कराव्या लागणार आहेत. बहुतांश महाविद्यालयांमध्ये आवश्यक प्रमाणात प्राचार्य व शिक्षकदेखील नाहीत. विद्यापीठातदेखील अशीच स्थिती आहे. या परिस्थितीत आहे त्या शिक्षकांमध्ये अध्यापनाचे कार्य चालणार की ‘आरडीसी’साठी पुढाकार घेण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहेत ‘आरडीसी’ची प्रमुख उद्दिष्टे?

- सुधारित संशोधन उत्पादकतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे.

- उद्योग, सरकार, समुदाय-आधारित संस्थांमध्ये परस्पर सहकार्य वाढविणे.

- संसाधने आणि निधी एकत्रित करून संशोधनात अधिकाधिक प्रवेश सुलभ करणे.

- उच्च शिक्षण संस्थांसाठी संशोधनाची महत्त्वाची क्षेत्रे ओळखणे आणि संबंधित क्लस्टर गट, फ्रंटलाईन पथके तयार करणे- संशोधन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी संशोधन धोरणांमध्ये सक्षम तरतुदी तयार करणे.

- उपकरणांची खरेदी आणि पुरेशा स्वायत्ततेसह आर्थिक व्यवस्थापनावर भर देणे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ