शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपूर विद्यापीठ : पुढील वर्षी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम होणार ‘अपडेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 9:36 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘अपडेट’ करण्यात येणार आहे. ‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे विद्यापीठ पालन करणार आहे. विद्यापीठात ‘मॉडेल’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून अभ्यास मंडळांसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

ठळक मुद्दे‘एआयसीटीई’च्या निर्देशांचे होणार पालन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘अपडेट’ करण्यात येणार आहे. ‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे विद्यापीठ पालन करणार आहे. विद्यापीठात ‘मॉडेल’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून अभ्यास मंडळांसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गतच ‘एआयसीटीई’ने पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम ‘अपडेट’ करणे आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल घडविण्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सहा प्रमुख अभियांत्रिकी शाखांसाठी देशातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांची समिती गठित केली होती. नवा अभ्यासक्रम तयार करण्यापूर्वी औद्योगिक-शैक्षणिक तज्ज्ञ, माजी विद्यार्थी तसेच संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या सूचना ेविचारात घेण्यात आल्या.अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात बुधवारी झालेल्या विद्वत् परिषदेत डॉ.राजेश पांडे यांनी प्रस्ताव मांडला. त्यानंतर या मुद्यावर चर्चा झाली. नागपूर विद्यापीठाने यासंदर्भात अगोदरच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नियमावलीदेखील तयार करण्यात येत आहे. अभ्यास मंडळासमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल व पुढील शैक्षणिक सत्रापासून ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्यात येईल, अशी माहिती डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.२० टक्के अभ्यासक्रम विद्यापीठ ठरविणार‘एआयसीटीई’ने उपलब्ध करुन दिलेला सर्व ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करणे अनिवार्य नाही. ८० टक्के अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’चा व २० टक्के अभ्यासक्रम विद्यापीठाच्या पातळीवर तयार केलेला राहील. ‘एआयसीटीई’ने तशी सूटच दिली असल्याची माहिती डॉ.काणे यांनी दिली.‘मॉडेल’ अभ्यासक्रमाची विशेषता

  • ‘इंडक्शन प्रोग्राम’चा अभ्यासक्रमात राहणार समावेश
  • संशोधन व नवनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांचा समावेश
  • विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राची नेमकी आवश्यकता व कार्यप्रणाली कळावी यादृष्टीने अभ्यासक्रमाची रचना
  • भारताचे संविधान, पर्यावरण विज्ञान-तंत्रज्ञान, भारताचे पारंपारिक ज्ञान यांचा अभ्यासक्रमात समावेश
  • ‘मॉडेल’ अभ्यासक्रमात ‘व्हर्च्युअल’ प्रयोगशाळांना स्थान
  • अभ्यासक्रमात उद्योजकतेवर आधारित विषयांचा समावेश.
  • अभ्यासक्रमाचे नियमित कालावधीने नूतनीकरण

कौशल्यावर जास्तीत जास्त भरनवे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिकता, अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण तसेच नाविन्यपूर्ण कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने तयार केले आहेत. या अभ्यासक्रमात प्रगत माहिती व तंत्रज्ञानाला स्थान असल्याने तो जागतिक पातळीवर सर्वमान्य ठरणारा असेल. आदर्श अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट तयार करताना भविष्यात आवश्यक विषय तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी आणि कौशल्यावर भर देण्यात आला आहे. यात आवश्यक व सोबतच वैकल्पिक विषयांसोबत प्रयोगशाळा प्रात्यक्षिकांची जोड देण्यात आली आहे. संशोधनातून बौद्धिक ज्ञानसंपदा तसेच ओपन इलेक्टिव्ह विषयांमध्ये औद्योगिक क्षेत्रातील अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञान, आर्थिक नियोजन, ऊर्जा, पर्यावरण व संवर्धन, औद्योगिक सुरक्षा आदी विषयांचा अंतर्भाव आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी