शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपूर विद्यापीठ : ऐन परीक्षेअगोदर बदलला ‘बी.कॉम’चा अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:31 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाने बीकॉमच्या सहाव्या सत्रातील अप्रत्यक्ष कर या विषयाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे.

ठळक मुद्देअप्रत्यक्ष कराच्या विषयात ‘जीएसटी’चा समावेश

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाने बीकॉमच्या सहाव्या सत्रातील अप्रत्यक्ष कर या विषयाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे.हा अभ्यासक्रम याच सत्रापासून तत्काळ प्रभावाने लागू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना आता नव्या अभ्यासक्रमाच्या हिशेबाने तयारी करावी लागणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम बदलल्याची कुठलीही माहिती नाही. अशास्थितीत विद्यार्थी परीक्षा कशी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास मंडळाने नवीन अभ्यासक्रमाची शिफारस केली होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी विशेषाधिकारात याला २३ जानेवारी रोजी मंजुरी दिली; सोबतच हा अभ्यासक्रम तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देशदेखील दिले. या अभ्यासक्रमाच्या आधारेच संबंधित विषयाच्या शिक्षकांना प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. कारण वर्गात विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणेच शिकविण्यात आले आहे.यामुळे विद्यार्थीदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. केंद्र शासनाने २०१७ मध्ये ‘जीएसटी’ लागू केला. नवीन कर प्रणाली लागू झाल्यानंतर दीड वर्ष विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदलासाठी कुठलाही पुढाकार घेतला नव्हता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत दोन दिवसाच्या आत अभ्यासक्रम तयार केला. याला लागू करण्यासाठी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याकडे शिफारस केली होती. यासंबंधात वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. विनायक देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी व्यस्त असल्याचे कारण देत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.केवळ ‘जीएसटी’चे ‘बेसिक’च शिकविणारलागू करण्यात आलेल्या ‘बीकॉम’च्या सहाव्या सत्रात अप्रत्यक्ष कराच्या नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ‘जीएसटी’ची अगदी ‘बेसिक’ माहिती देण्यात आली आहे. अभ्यासक्रमाचा उद्देशदेखील हाच ठेवण्यात आला आहे. पहिल्या ‘युनिट’मध्ये ‘जीएसटी’ची ओळख, दुसऱ्या ‘युनिट’मध्ये ‘जीएसटी’चे प्रकार, तिसऱ्या ‘युनिट’मध्ये ‘जीएसटी’चा भरणा तर चौथ्या ‘युनिट’मध्ये ‘कस्टम्स अ‍ॅक्ट’चा समावेश करण्यात आला आहे..

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ