नागपूर विद्यापीठ : ३१ महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:20 IST2019-11-22T00:19:24+5:302019-11-22T00:20:34+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आवश्यक प्रमाणात शिक्षक तसेच सुविधा नसणे इत्यादी कारणांसाठी १३२ महाविद्यालयांत प्रवेशबंदी लावली होती. परंतु आता यातील ३१ महाविद्यालयांवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत.

Nagpur University: Admission restriction on 31 colleges lifted | नागपूर विद्यापीठ : ३१ महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठविली

नागपूर विद्यापीठ : ३१ महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठविली

ठळक मुद्देआवश्यक सुविधांची पूर्तता केल्याने निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आवश्यक प्रमाणात शिक्षक तसेच सुविधा नसणे इत्यादी कारणांसाठी १३२ महाविद्यालयांत प्रवेशबंदी लावली होती. परंतु आता यातील ३१ महाविद्यालयांवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक सुविधांची पूर्तता केल्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठात अनेक महाविद्यालयांत नियमांची पूर्तता होत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. निरंतर संलग्निकरणाची प्रक्रिया न राबविणे, आवश्यक प्रमाणात शिक्षक नसणे तसेच पायाभूत सुविधांचा अभाव या कारणांनी विद्यापीठाने १७ मे रोजी १२९ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांवर प्रवेशबंदी लावली होती. त्यानंतर काही दिवसांतच आणखी तीन महाविद्यालयांवर बंदी लावण्यात आली. ऐन प्रवेशांच्या अगोदर विद्यापीठाने हे पाऊल उचलल्याने शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाला होता. या कारवाईमुळे जाग आलेल्या काही महाविद्यालयांनी नियमित शिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. यासंदर्भातील मान्यतेचे प्रस्तावदेखील विद्यापीठाकडे पाठविण्यात आले. तर २० महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. आवश्यक सुविधांची पूर्तता व शिक्षकांची नियुक्ती झाल्यावर त्यांच्यावरील प्रवेशबंदी उठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या महाविद्यालयांसह या इतर ११ महाविद्यालयांनी त्रुटींची पूर्तता केल्याने त्यांच्यावरील प्रवेशबंदी हटविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

संकेतस्थळावर यादी नाहीच
प्रवेशबंदी लावण्यात आली असताना विद्यापीठाने संकेतस्थळावर सर्व महाविद्यालयांची यादी टाकली होती. परंतु ३१ महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी हटवत असताना विद्यापीठाने संकेतस्थळावर यादी टाकण्याची तसदी घेतलेली नाही.

Web Title: Nagpur University: Admission restriction on 31 colleges lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.