शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अनियंत्रित वाहनाने चार वर्षाच्या चिमुकल्यास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:09 IST

शहरात रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी सकाळी शांतिनगर परिसरातील दही बाजार पुलाजवळ एका अनियंत्रित वाहनाने चार वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले. अवनीश अमोल मदनकर रा. शांतिनगर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मागील सहा दिवसात रस्ते अपघातात नऊ लोकांचा जीव गेला. यात तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. या अपघातांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देदही बाजार पुलावरील घटना : सहा दिवसात नऊ जणांचा मृत्यू, तीन चिमुकल्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी सकाळी शांतिनगर परिसरातील दही बाजार पुलाजवळ एका अनियंत्रित वाहनाने चार वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले. अवनीश अमोल मदनकर रा. शांतिनगर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मागील सहा दिवसात रस्ते अपघातात नऊ लोकांचा जीव गेला. यात तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. या अपघातांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.अवनीशचे वडील अमोल मदनकर हे दाल मिलमध्ये सुपरवायजर आहेत. अमोल पत्नी प्रियंका आणि मुलासोबत राहतात. प्रियंका कोचिंग क्लासमध्ये काम करते. अवनीश नर्सरीमध्ये शिकत होता. नुकतीच आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अमोलने आरटीईसाठी अर्ज केला होता. यासाठी त्याला स्वत:चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि मुलाचे आधर कार्ड बनवाचे होते. अमोलने आज ड्युटीवरून सुटी घेतली होती. तो अ‍ॅक्टिव्हाने अवनीशसोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र व आधार कार्ड बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होता. सकाळी ११ वाजता अमोल इतवारी स्टेशन मार्गाकडूनदही बाजार पूल पार करीत होता. अमोलला मारवाडी चौकाकडे जायचे होते. दही बाजार टी पॉर्इंटजवळ मागून आलेल्या टाटा यस वाहनाने (एम.एच./ ४०/ वाय/ २३३२) अ‍ॅक्टिव्हाला कट मारली. कट लागल्याने अमोलचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अवनीश अ‍ॅक्टिव्हावरून पडला आणि टाटा यस गाडीखाली आला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. नागरिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यांचे म्हणणे होते की, पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी लपून वसुली करीत असतात. नागरिकांच्यानुसार टी पॉर्इंटवर वाहतूक पोलीस कधीच तैनात नसतात. वरिष्ठ अधिकाºयांकडेही याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु काहीही कारवाई झाली नाही. दही बाजार पुलावर अपघाताचे धोके वाढले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी यादृष्टीने पाऊल उचलावे, अशी मागणी करण्यात आली होती. शांतिनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विनोद कोवे, माजी नगरसेवक रवी डोळस, सुनील बारापात्रे, अमोल वांद्रे, संजय मारोडे, प्रशांत रेवतकर, हर्षल शेंडे, रोशन कावळे, कुणाल वंजारी, कैलाश पुरके, सचिन मुटकुरे, पिंटू उकिनकर, बाबा रंगारी आणि प्रणव मांजीकर यांनी दही बाजार पुलावर वाहतूक पोलीस तैनात करण्याची आणि अवनीशच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.शांतिनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून आरोपी चालक जावेंद्र येडे (४०) रा. मां अंबेनगर पारडी याला अटक केली.गेल्या सहा दिवसात नऊ लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. यात तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. मंगळवारी सयंकाळी वर्धा रोडवर स्नेहनगर बस स्टॉपजवळ एसटी बसमध्ये सापडून दीड वर्षाचा मुलगा उत्कर्ष ऊर्फ साई नागराज गोल्हर याचा मृत्यू झाला. सेलू वर्धा येथील रहिवासी गोल्हर परिवार मंगळवारीच नागपूरला आला होता. उत्कर्ष त्याची आई, बहीण आणि आजीसोबत नागपूरला आला होता. सायंकाळी ६.१५ वाजता सर्व सेलूला परत जाण्यासाठी बस स्टॅँडवर आले. ते एसटीची वाट पाहत होते. त्यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी यशोधरानगर येथील गरीबनवाजनगर येथे अनियंत्रित पिकअ‍ॅप वाहनाने तीन वर्षाची चिमुकली अलिस्मा अमरीनला तिच्या घरासमोरच चिरडले होते.पोलीस बनवित होते चालानस्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झाला त्यावेळी दही बाजार पुलाजवळून थोड्या दूर अंतरावर वाहतूक पोलीस चालान बनवण्यात व्यस्त होते. त्यांच्यापासून वाचण्याच्या उद्देशानेच हा अपघात झाल्याचाही संशय वर्तविण्यात येत आहे. नागरिक संतप्त झाल्याचे समजताच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले.आई-वडिलांचे स्वप्न भंगलेएकुलत्या एक मुलाला अपघातात गमावलेल्या मदनकर दाम्पत्याला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. विनोद आणि प्रियंका अवनीशला शाळेत पाठवण्याचे स्वप्न रंगविले होते. प्रियंकाने अवनीशला फोटो काढण्याच्या बहाण्याने पतीसोबत पाठवले होते. आईची गोष्ट ऐकून तो हसतखेळत घरातून निघाला होता. अवनीश मृतावस्थेत परतेल असे कुणालाही वाटले नव्हते. अमोल समोरच हा अपघात घडल्याने तो प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. वस्तीतही शोक पसरला आहे.इनोवाने वृद्धास चिरडलेजामठा येथे इनोव्हाचालकाने अ‍ॅक्टिव्हा चालक वृद्धाला चिरडले. सहारा सिटी येथील रहिवासी असलेले ६० वर्षीय जयंत दिवाकर पेठकर सोमवारी सायंकाळी अ‍ॅक्टिव्हाने जात होते. जामठाजवळ इनोव्हा क्रमांक एम.एच. /०९/बी.एक्स./००७० च्या चालकाने अ‍ॅक्टिव्हाला धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर