शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ते पुणे अंतर आता सहा तासांवर येणार; गडकरी-फडणवीस यांच्या उपस्थितीत करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 14:29 IST

हा महामार्ग समृद्धी महामार्गाशीही जोडण्यात येणार असल्याने नागपूर ते पुणे अंतर आता सहा तासांवर येईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

नागपूर : समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर चार तासांवर आले आहे. मुंबईसुद्धा जवळ आली आहे. परंतु, पुण्याला जायला मात्र वेळ लागत आहे. ही अडचणही आता लवकरच दूर हाेणार आहे. पुणे-अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर असा नवीन ग्रीन फील्ड महामार्ग तयार करण्यात येणार आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गाशीही जोडण्यात येणार असल्याने नागपूर ते पुणे अंतर आता सहा तासांवर येईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

हा रस्ता एमएसआयडीसी बांधणार असून, या दोघांच्याही उपस्थितीत शुक्रवारी नागपुरात केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र यांच्यात करार करण्यात आला. नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाचे उपसचिव मयूर गोवेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंते दिनेश नंदनवार प्रामुख्याने उपस्थित होते. मयूर गावेकर व दिनेश नंदनवार यांनी या करारावर स्वाक्षरी केली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे ऑनलाइन सहभागी झाले होते.   

हा रस्ता मागास भागासाठी वरदान ठरेल : गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, हा रस्ता मराठवाड्यातील एकूण मागास व दुष्काळी भागातून जातो. एकूण २५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेला हा रस्ता मराठवाडा या मागास भागासाठी, तसेच उद्योग व पर्यटनासाठी वरदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

-  याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे, अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर येथील वाहतुकीची होणारी कोंडी पाहता, या रस्त्याची आवश्यकता होतीच. समृद्धीमुळे मुंबईला पोहोचणे सोपे झाले होते. मात्र, पुण्यापर्यंत पोहोचायला वेळ लागायचा. -   हा रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार असल्याने आता नागपूर ते पुणे अंतरही सहा तासांवर येईल.  महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्वागत केले. अंशुमाली श्रीवास्तव यांनी आभार मानले. 

ग्रीन फिल्ड महामार्गाची मुख्य वैशिष्ट्ये -  २३० किमी लांबी-  सहा लेन -  प्रवेश नियंत्रित - १२० किमी प्रति तास डिझाइन स्पीड-  १२७,००० पेक्षा अधिक पीसीयू डिझाइन क्षमता-  ३,७५२ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरीPuneपुणे