शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात टिप्परने दुचाकीचालकाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:11 IST

बीएसएनएलचा कंत्राटदार आणि टिप्परचालकाच्या निष्काळजीपणामुळे लकडगंजमध्ये भीषण अपघात घडून एका दुचाकीचालकाचा करुण अंत झाला.

ठळक मुद्देसेंट्रल एव्हेन्यूवर भीषण अपघात : टिप्परचालक, बीएसएनएल कंत्राटदारावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीएसएनएलचा कंत्राटदार आणि टिप्परचालकाच्या निष्काळजीपणामुळे लकडगंजमध्ये भीषण अपघात घडून एका दुचाकीचालकाचा करुण अंत झाला. प्रशांत धर्माजी सोनटक्के (वय ४७) असे मृतकाचे नाव असून, ते गिट्टीखदानमधील कृष्णनगरात राहत होते.सोनटक्के त्यांच्या दुचाकीने सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास लकडगंजमध्ये आले होते. कामाच्या निमित्ताने ते टेलिफोन एक्सचेंज चौकातून जात होते. सेंट्रल एव्हेन्यू, देना बँकेसमोर बीएसएनएलच्या कंत्राटदाराने खोदकाम करून मातीचे ढिगारे जमवून ठेवले आहे. तेथून जात असताना सोनटक्के यांची अ‍ॅक्टिव्हा घसरली. त्यामुळे सोनटक्के खाली पडले. त्याचवेळी वेगात आलेला टिप्पर (एमएच ३१/ ईएन ०७४४)च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून सोनटक्के यांना चिरडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. जमावाने टिप्परचालकावर धाव घेतली. माहिती कळताच लकडगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत केले. मृतदेह मेयोत पाठविण्यात आला. आरोपी टिप्परचालक रोहित संजय समुद्रे (वय २७, रा. मानेवाडा) तसेच बीएसएनएलच्या कंत्राटदाराविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. समुद्रेला अटक करण्यात आली.दुचाकीवरून पडून महिला ठारधावत्या दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या शशिकला सुरेश जगदीश (वय ४८) या महिलेचा करुण अंत झाला. शशिकला पिपळा फाटा येथील रहिवासी होत्या. १८ एप्रिलला सकाळी ७.२० वाजता त्या नातेवाईकाच्या दुचाकीवर मागे बसून सक्करदरा चौकाकडे जात होत्या. पिपळा फाटा नाल्याजवळ दुचाकी उसळल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आणि त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी ६.१५ वाजता डॉक्टरांनी शशिकला यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.वर्धेतील वृद्धाचा अपघाती मृत्यूवर्धा येथील रामनगरात राहणारे जानराव छन्नोजी लोणकर (वय ७५) यांचा नागपुरात अपघाती मृत्यू झाला. रविवारी रात्री७.२० च्या सुमारास लोणकर एमआयडीसीतील आयसी चौकाजवळच्या मार्गावरील पुलावर जखमी अवस्थेत आढळले होते. त्यांनाउपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले. वैभव नंदकिशोर भिलकर (वय २४) यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. लोणकर तेथे कसे पोहोचले, त्यांचा अपघात कशामुळे झाला, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू