नागपुरात  तरुणीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:41 AM2018-03-02T00:41:43+5:302018-03-02T00:41:56+5:30

मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एका तरुणाने तिला मानसिक त्रास देणे सुरू केले. पाठलाग करून तिला अश्लील मेसेज पाठवून भंडावून सोडले. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून तिचे लग्नही तोडले. आता त्याने तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करून स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

In Nagpur Threat to assaulted with acid attack to girl | नागपुरात  तरुणीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

नागपुरात  तरुणीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

Next
ठळक मुद्देमैत्रीपूर्ण संबंधाला विचित्र वळण : कोराडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एका तरुणाने तिला मानसिक त्रास देणे सुरू केले. पाठलाग करून तिला अश्लील मेसेज पाठवून भंडावून सोडले. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून तिचे लग्नही तोडले. आता त्याने तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करून स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
अतुल अशोक घोंगडे (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो हिंगणा जवळच्या इसासनीत राहतो. अतुलच्या नात्यातील एक उच्चशिक्षित तरुणी कोराडी परिसरात राहते. नात्यात लागत असल्यामुळे तिच्यासोबत त्याची ओळख आणि बोलणीही होती. पुढे त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. त्यामुळे एकमेकांशी बोलणे, मेसेज पाठविणे हा प्रकारही होताच. काही दिवसांपूर्वी अतुलने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. घरच्यांना तिने ते सांगितले. पालकांनी त्याला नकार दिल्यामुळे तरुणीनेही त्याचा प्रस्ताव नाकारला. तिने त्याच्यापासून अंतर राखणे सुरू केल्याने अतुल आक्रमक झाला. तो तिला वारंवार मेसेज फोन करू लागला. त्याला वारंवार समजावूनही तो ऐकत नव्हता. तरुणी जेथे कामाला आहे, तेथे जाऊन तो तिचा पाठलाग करू लागला. बदनामीच्या धाकाने तरुणीने गप्प राहणे पसंत केले. त्याचा त्रास वाढत असल्यामुळे घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे जोडण्याच्या हालचाली सुरू केल्या. एका तरुणाशी तिचे लग्न जवळपास पक्के होण्याच्या तयारीत असताना आरोपी अतुलने त्यात खोडा केला. आपले हिच्यासोबत प्रेमसंबंध आहेत, अशी थाप मारून त्याने तिची बदनामी करण्यासोबतच लग्नही तोडले.
प्रकरणाला दुसरी बाजू?
बुधवारी आरोपी अतुल तिच्या घरी गेला. त्याने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. आपल्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून तुला विद्रुप करेन आणि स्वत: आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली. त्याच्यापासून धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे अखेर तरुणीने कोराडी ठाण्यात धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अतुलविरुध्द गुन्हा नोंदविला. या प्रकरणाला दुसरी बाजू असल्याचे पोलीस सांगतात. त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.

Web Title: In Nagpur Threat to assaulted with acid attack to girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.