शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नागपुरकरांचे 'लाख-लखते' पुणेरी प्रेम; महिनाभरात पुणे गाठणारांची संख्या एक लाखावर!

By नरेश डोंगरे | Updated: September 26, 2024 23:36 IST

छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय : खासगी बस रोजच हाऊसफूल्ल

- नरेश डोंगरे

नागपूर : देशभरातील नागरिकांचे मायानगरी मुंबईवरील प्रेम सर्वश्रूत आहे. सक्रीनवर चमकण्यासाठी, रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी आणि अशाच दुसऱ्या कोणत्या कारणाने देशातील कानाकोपऱ्यातून रोज मोठ्या प्रमाणावर नागरिक मुंबईत दाखल होतात. नागपूरकर मंडळी मात्र मुंबईसोबतच पुण्यावरही लाखमोलाचे प्रेम करतात. होय, महिनाभरात एक लाखावर नागपूरकर पुणे गाठतात. खासगी बस प्रवाशांच्या संख्येतून हे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मात्र, पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. एज्युकेशन हब आणि रोजगाराच्या मोठ्या संधी असल्याने ठिकठिकाणची मंडळी पुण्यात स्थिरावली आहे. नागपूर-विदर्भातील मोठ्या संख्येत विद्यार्थी पुण्याला शिकायला अन् नोकरीच्या निमित्ताने राहतात. त्यानिमित्ताने त्यांचे तात्पुरते वास्तव्य असले तरी या मंडळीपैकी अनेक जण रोज आपल्या गाव, घर अन् नातेवाईकाला भेटण्यासाठी नागपूर-विदर्भात जात येत असतात. त्यात ट्रॅव्हल्सने येणारा-जाणारांची संख्या मोठी आहे.

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या नागपुरात एकूण ३०० ट्रॅव्हल्स आहेत. त्या महाराष्ट्रातील जवळपास बहुतांश मोठ्या शहरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच आंध्र प्रदेशमधील विविध शहरात प्रवाशांची ने-आण करतात. यातील सर्वाधिक ९० बसेस पुण्यासाठी धावतात आणि ३६ सिटर असलेली प्रत्येक बस अपवाद वगळता रोजच पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांनी खच्चून भरलेली असते. 

अर्थात रोजचा हिशेब केल्यास नागपुरातून खासगी बसने पुण्याला रोज ३२४० प्रवासी जातात. महिन्याची प्रवाशांची ती संख्या ९७ हजारांवर जाते. सणोत्सवाच्या दिवसांचा विचार केल्यास हा आकडा लाखांवर जातो. या आकडेवारीतून नागपूरकरांचे लखलखते पुणेरी प्रेम अधोरेखित होते. पुण्याचे नियमित ट्रॅव्हल्सचे तिकिट १२०० ते १५०० दरम्यान असते. तर, उन्हाळ्यात आणि सणोत्सवाच्या दिवसांत ते २००० च्या घरात जाते.

छत्रपती संभाजीनगरालाही जाणारांची संख्या मोठीनागपुरातून खासगी बसने छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. संभाजीनगरसाठी नागपूरहून रोज २५ बसेस सुटतात. बसमधील ३६ पैकी ३० सिट जवळपास रोजच पॅक असतात. अर्थात महिन्याला २२ ते २५ हजार प्रवासी संभाजीनगरला जातात.

नाशिक, मुंबई, इंदोर अन् हैदराबाद बसमध्येही गर्दीमुंबईला रोज १० बसेस जातात आणि नागपूरहून रोज मायानगरीत जाणारांची संख्या ३०० ते ४०० च्या घरात आहे. नाशिक १५ बसेस आणि प्रवाशांची संख्या ४०० ते ५००, हैदराबाद रोज ६५ बसेस आणि प्रवाशी संख्या १९०० ते २०००, इंदोर १५ बसेस आणि प्रवाशी संख्या ४०० ते ५०० एवढी आहे.

प्रवाशांना आरामदायक प्रवासाची अनुभूती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. पुण्याला जाणाऱ्या एका बसला सुमारे ४ हजार टोल टॅक्स द्यावा लागतो. याशिवायही अन्य खर्च असतात. वर्षाला सरासरी १५ कोटींचा टॅक्स आम्ही सरकारच्या तिजोरीत जमा करतो.- बाबासाहेब डवरेअध्यक्ष, शहर बस ओनर्स असोसिएशन, नागपूर.

टॅग्स :nagpurनागपूर