शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

गडद धुके बनले रेल्वेसाठी स्पीड ब्रेकर, गाड्या रेंगाळल्या; वेळापत्रक विस्कळीत, रेल्वे वाहतुकीला जबर फटका

By नरेश डोंगरे | Updated: January 15, 2024 23:28 IST

Indian Railway:

- नरेश डोंगरे नागपूर - उत्तर भारतात थंडीची जोरदार लाट आल्याने सर्वत्र गडद धुके निर्माण झाले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुक प्रभावित झाली आहे. उत्तर भारतातून नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या स्पीडला धुक्यामुळे ब्रेक लागला असून रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक पुरते विस्कळीत झाले आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून उत्तर भारतात गारठा निर्माण झाला असून वातावरणाने गडद धुक्याची शाल पांघरली आहे. त्यामुळे सोमवारी अनेक रेल्वेगाड्या विलंबाने नागपुरात पोहोचल्या. उशिरा धावत असलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत.

१२५११ राप्तीसागर एक्स्प्रेस १६ तास उशिरा, १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेस १५ तास, १२६१६ जीटी एक्स्प्रेस १२ तास, २० मिनिट, १२६२६ केरला एक्स्प्रेस ११ तास, २०८०६ एपी एक्स्प्रेस, १२७२२ दक्षिण एक्स्प्रेस १० तास, १२७२३ तेलंगणा एक्स्प्रेस १० तास, २२५१२ कर्मभूमी एक्स्प्रेस ८.३० तास, २२४०४ पाँडेचरी सुपरफास्ट एक्स्प्रेस ८ तास, १२६२२ एक्स्प्रेस ७ तास, १२९५० सिकंदराबाद एक्स्प्रेस ६ तास, १८०३० शालिमार एलटीटी एक्स्प्रेस ४.३० तास, २२८४५ पुणे हटिया सुपर फास्ट एक्स्प्रेस ४.१० तास, १२८११ एलटीटी हावडा सुपर फास्ट एक्स्प्रेस ४ तास, १२८१० हावडा एलटीटी एक्स्प्रेस ४ तास, १२७२१ दक्षिण एक्स्प्रेस ३.२० तास, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ३ तास, १२१३० हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस २.५० तास, ०२१३९ मुंबई नागपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस २.४० तास, १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस २.४० तास, १८२३८ छत्तीसगड एक्स्प्रेस २.४५ तास, १२८६० गीतांजली एक्स्प्रेस २.१५ तास, १२९६८ सुपर फास्ट एक्स्प्रेस २ तास १० मिनटे उशिरा धावत आहे.

फलाट, प्रतीक्षालयात गर्दी वाढलीविविध गाड्या उशिरा धावत असल्याने या गाड्यांच्या प्रतीक्षेतील प्रवाशांची रेल्वे स्थानकावरच्या विविध फलाटांवर तसेच प्रतीक्षालयात गर्दी वाढली आहे. परिणामी खान-पानाच्या स्टॉलवरही झुंबड बघायला मिळत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर