शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शिक्षकाने केली अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:51 IST

लकडगंज येथील अयाचित मंदिराजवळ एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी केली. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पालकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देकोचिंग क्लासमधील प्रकार : पालकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंज येथील अयाचित मंदिराजवळ एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी केली. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पालकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.रामकृष्ण सुरुसे (४५) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. रामकृष्ण याचे अयाचित मंदिराजवळ कोचिंग क्लास आहे. तो दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. परिसरातील प्रतिष्ठित कोचिंग क्लास असल्याने त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिकायला येतात. पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीची विद्यार्थिनी आहे. रामकृष्णने मंगळवारी सकाळी विद्यार्थिच्या कुटुंबीयांना फोन करून ‘तो गावी जात आहे. तेव्हा मुलीच्या हातून शिकवणी शुल्क पाठवण्यास’ सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी ५ हजार रुपये देऊन मुलीला शिकवणी वर्गात पाठवले. सकाळी १० वाजता विद्यार्थिनी कोचिंग क्लासमध्ये पोहोचली. ख्रिसमसची सुटी असल्याने कोचिंग क्लास बंद होता. तिथे रामकृष्णशिवाय कुणीच नव्हे. त्याने विद्यार्थिनीसोबत आपत्तीजनक व्यवहार केला. यामुळे मुलगी घाबरली. ती बाहेर निघून गेली. घरी पोहोचल्यावर तिच्या एकूणच व्यवहारामुळे आईला संशय आला. तिने विचारपूस केली तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या घरच्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.रामकृष्ण हा मूळचा आर्वीचा आहे. त्याचे म्हणणे आहे की, विद्यार्थिनी त्याच्या मुलीच्या वयाची आहे. तिला मुलीच्या नात्यानेच लाड केला. परंतु रामकृष्णच्या व्यवहरामुळे पालक अतिशय संतापले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, शिकवणी शुल्क घेण्याच्या बहाण्याने मुलीला कोचिंग क्लासमध्ये बोलावण्याचे कुठलेही औचित्य नव्हते.

टॅग्स :MolestationविनयभंगTeacherशिक्षक