लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावरचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यातील रिपब्लिक डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परेडमध्ये यंदा नागपूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संयोजनात राजपथावर सादरीकरण करणाऱ्या १६० विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पंतप्रधानांसह १० आसियान देशांच्या प्रमुखांसमोर या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने संस्कृती व परंपरेचे गौरवशाली दर्शन घडवले. दिल्लीच्या हाडे गोठविणाऱ्या थंडीत या विद्यार्थ्यांनी कठोर सराव केला आणि या सरावाच्या बळावरच प्रथम पुरस्कारही खेचून आणला. रक्षा मंत्रालयाच्या परीक्षकांनी नागपूरकर चमूला सर्वाधिक गुण दिले. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या कुशल नियोजनाचा मोठा वाटा आहे.ढोल-ताशाच्या गजरात होणार स्वागतआरडी परेडमध्ये प्रथम क्रमांक मिळवून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणाऱ्या विद्यार्थ्यांची चमू सोमवारी सकाळी ९ वाजता गोंडवाना एक्स्प्रेसने नागपुरात परत येत आहे. ढोल-ताशाच्या गजरात या विजयी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती केंद्राचे जनसंपर्क अधिकारी गणेश थोरात यांनी दिली.
नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जिंकली दिल्ली : आरडी परेडमध्ये प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:26 IST
२६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावरचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यातील रिपब्लिक डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परेडमध्ये यंदा नागपूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जिंकली दिल्ली : आरडी परेडमध्ये प्रथम
ठळक मुद्देदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संयोजनात राजपथावर सादरीकरण