आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात नागपूरकर विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:35+5:302021-02-05T04:44:35+5:30
नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी नाशिक येथे पार पडला. यात २०१९-२० या वर्षात उत्तीर्ण झालेल्या ...

आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात नागपूरकर विद्यार्थ्यांचा गौरव
नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी नाशिक येथे पार पडला. यात २०१९-२० या वर्षात उत्तीर्ण झालेल्या नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांचादेखील पदके व पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची विद्यार्थिनी अवंतिका ठोंबरे हिला एमबीबीएसमधील कामगिरीसाठी ‘डॉ.कुणाल महादुले सुवर्णपदक’, ‘डॉ.रवींद्र आणि डॉ.सरोज केकान सुवर्णपदक’ व ‘एकनाथराव नामदेवराव सातदिवे सुवर्णपदकाने गौरविण्यात आले, तर ‘एम.डी.’मधील गुणवंत विद्यार्थिनी प्राजक्ता साठवणे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) हिला विठ्ठल श्रीराम बाकरे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ‘एम.एस.’ (ऑप्थोल्मोलॉजी) मधील कामगिरीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्मितल मेटांगे हिला बागुबाई बाकरे स्मृती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. ‘एमडीएस’ (ओरल पॅथालॉजी आणि मायक्रोबायोलॉजी) मधील कामगिरीसाठी व्हीपीएसएम डेंटल कॉलेजमधील गीता कार्यकर्ते हिला डॉ.दिनेश दफ्तरी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. श्री आयुर्वेद महाविद्यालयातील वृणालिनी खोब्रागडे हिला ‘बीएएमएस’च्या कामगिरीसाठी अन्नपूर्णा लखपती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.