शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'शिवसेना कोकणवासियांची दिशाभूल करतेय', नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 12:07 IST

नाणार प्रकल्प मुद्यावरून विधानसभेत शिवसेना पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नागपूर - नाणार प्रकल्प मुद्यावरून विधानसभेत शिवसेना पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ शिवसेनाच नाहीतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाणार प्रकल्प मुद्यावरुन रिंगणात उडी घेतली आहे. नाणार मुद्यावर चर्चा करण्याची आमदारांकडून मागणी केली जात आहे. यावेळी सभागृहात विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनीही वेलमध्ये उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. तर दुसरीकडे नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केले.

'नाणार'वरुन शिवसेना-काँग्रेसमध्ये वादंग

शिवसेना नाणारवासियांची दिशाभूल करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणताच, शिवसेनेच्या आमदारांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

'विखे-पाटील यांनी शिवसेनेला शिकवू नये'

नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस आणि काही लोकांना हे बोचले, अशी टीका शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यातूनच शिवसेनेविरुद्ध जहरी भाषा बोलण्याचे त्यांनी काम केले. शेतक-यांचा संप मोडण्यात पुढाकार घेणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला शिकवू नये, असेही नीलम गो-हे यांनी यावेळी म्हटले. शिवाय, शिवसेना नाणारवासियांच्या बाजूने असताना फूट पाडण्याचे प्रयत्न करू नये, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

नाणार प्रकल्प धोकादायक - भास्कर जाधव

ग्रीन रिफायनरी आणि न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट एकत्र आल्यास मोठा धोका होऊ शकतो, असे विधान अनिल काकोडकर यांनी वक्तव्य केले होते. याचा गांभीर्याने विचार करावा. जगात कुठेही न्यूक्लिअर पॉवर आणि ग्रीन रिफायनरी प्रकल्प एकत्र नाहीत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले. ते पुढे असंही म्हणाले की, एकीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. दुसऱ्या बाजूला ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पात एरिअल अंतर २.५ किलोमीटरचा आहे. त्यामुळे हा प्रकल्प धोकादायक आहे.  हा 17 गावांचा प्रश्न नाही हा संपूर्ण कोकणाचा प्रश्न आहे. कोकणाच्या आजूबाजूला सांगली आणि कोल्हापूर जिल्हेदेखील आहेत. या जिल्ह्यांनाही धोका आहे. सरकारने हट्ट सोडावा. आम्ही कोकणातील लोक जिवंत राहिलो तरच आम्हाला रोजगार मिळेल. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून विरोधी पक्षनेते यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर तात्काळ यावर चर्चा करा.

 

 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पShiv Senaशिवसेनाnagpurनागपूरcongressकाँग्रेस