शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये राज्यात नागपूर दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:03 IST

हवेतील प्रदूषण व धूम्रपानाच्या वाढत्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात होणाऱ्या विविध कर्करोगापैकी जवळपास ७ टक्के रुग्ण एकट्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने बळी पडतात. भारतीय कर्करोग संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात  एक लाख लोकसंख्येमागे ९.२ टक्के लोक फुफ्फुसाच्या कॅन्सरने पीडित आहेत. यात पहिल्या स्थानावर मुंबई (१०.३ टक्के), तर दुसऱ्या स्थानावर नागपूर (८.८ टक्के ) आहे. तिसऱ्या स्थानी पुणे (७.८ टक्के) व चवथ्या स्थानी औरंगाबाद (५.९ टक्के) आहे. धक्कादायक म्हणजे, जून ते डिसेंबर २०१६ या सहा महिन्यात एकट्या नागपूरच्या मेडिकलमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे तब्बल ४४ रुग्ण आढळून आले होते.

ठळक मुद्देएक लाख लोकसंख्येत ८.८ टक्के रुग्ण : मेडिकलमध्ये वाढतेय रुग्णांची संख्याजागतिक फुफ्फुस दिन

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवेतील प्रदूषण व धूम्रपानाच्या वाढत्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात होणाऱ्या विविध कर्करोगापैकी जवळपास ७ टक्के रुग्ण एकट्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने बळी पडतात. भारतीय कर्करोग संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात  एक लाख लोकसंख्येमागे ९.२ टक्के लोक फुफ्फुसाच्या कॅन्सरने पीडित आहेत. यात पहिल्या स्थानावर मुंबई (१०.३ टक्के), तर दुसऱ्या स्थानावर नागपूर (८.८ टक्के ) आहे. तिसऱ्या स्थानी पुणे (७.८ टक्के) व चवथ्या स्थानी औरंगाबाद (५.९ टक्के) आहे. धक्कादायक म्हणजे, जून ते डिसेंबर २०१६ या सहा महिन्यात एकट्या नागपूरच्या मेडिकलमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे तब्बल ४४ रुग्ण आढळून आले होते.जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार जगात फुफ्फुसाच्या आजाराने भारतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. १०० कॅन्सर रुग्णांमध्ये १३ रुग्ण हे फुफ्फुसाच्या कॅन्सरने पीडित असतात. भारतात दरवर्षी या कॅन्सरच्या ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते, तर ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण या रोगामुळे दगावतात. महाराष्ट्रातही याचे प्रमाण मोठे आहे. आता विदर्भातही याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, विदर्भात सध्याच्या स्थितीत वीज निर्मितीचे १४ प्रकल्प आहेत. परिणामी, या भागात श्वसनाच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाची टक्केवारी वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.जगात १०० कोटी लोक धूम्रपानाच्या धुरातफुफ्फुसाच्या कॅन्सरचे मुख्य कारण हे धूम्रपान व हवेतील प्रदूषण आहे. मेडिकलच्या क्षय व उररोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जगात कमीतकमी एक चतुर्थांश लोक बंद खोलीतील विषारी धुरांना सामोरे जातात. १०० कोटी लोक विषारी वायू श्वासोच्छवासाद्वारे घेतात, तर १०० कोटी लोक धूम्रपानाच्या विषारी धुराचा सामना करतात. या धुरामुळे श्वसनक्रियेचा आजार होण्याची दाट शक्यता असते. १९६४ पासून ते आतापर्यंत जवळपास २५ लाख लोक जे धूम्रपान करीत नव्हते त्यांचा धूम्रपानाच्या धूरामुळे मृत्यू झाला आहे.युवकांना धूम्रपान न करण्यास प्रेरित करायुवकांना धूम्रपान न करण्यास प्रेरित करणे व इतर लोकांची धूम्रपानाच्या व्यसनातून सुटका करणे हाच यावर एक उपाय आहे. रोज धूम्रपान करणाऱ्यांमध्ये श्वसनप्रक्रियेची क्षमता कमी कमी होत जाते. गर्भवती असताना धूम्रपान न केल्यास व बाळंतपणानंतर धूम्रपानाच्या धुराच्या समोर न गेल्यास बाळांमध्ये दम्याची गंभीरता कमी होते. निरोगी फुफ्फुसे ठेवण्याकरिता नियमितपणे तपासणी आवश्यक ठरते.डॉ. सुशांत मेश्रामविभाग प्रमुख क्षय व उररोग विभाग, मेडिकल

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य