शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

सर्वाधिक मानवी चाचणी करणारे नागपूर दुसरे सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 05:16 IST

सुमेध वाघमारे नागपूर : भारतात तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोज ३७५ व्यक्तींना देऊन पहिला टप्पा थांबविण्यात आला. मानवी ...

सुमेध वाघमारेनागपूर : भारतात तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोज ३७५ व्यक्तींना देऊन पहिला टप्पा थांबविण्यात आला. मानवी चाचणीत सहभागी असलेल्या देशातील १२ सेंटरमधून नागपूरच्या गिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे सर्वाधिक मानवी चाचणी करणारे दुसरे सेंटर ठरले. हॉस्पिटलने ५५ व्यक्तींना लस दिली, तर पीजीआय रोहतकने ८१ व्यक्तींना लस दिली. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने 'कोव्हॅक्सिन वॉरियर्स’ होण्याचे आवाहन केल्याने १००वर वॉरियर्स पुढे आले आहेत.

भारतीय औषध महानियंत्रकने (डीसीजीआय) कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला परवानगी दिल्यानंतर भारत बायोटेक, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटयूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थाच्या देखरेखीत ही मानवी चाचणी होत आहे. सुरुवातीला एम्स दिल्ली, एम्स पाटणा, निझामुद्दीन इन्स्टिट्यूट हैदराबाद व पीजीआय रोहतक या चार संस्थांनी चाचणीला सुरुवात केली. या संस्था मिळून ५० व्यक्तींना लस दिल्यानंतर व कुणाच्याही आरोग्याचा तक्रारी नसल्याने उर्वरीत आठ संस्थांना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार नागपूरमधील गिल्लूरकर हॉस्पिटलने ६०वर व्यक्तींची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविले. यातील ५५ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने योग्य ठरले. २७ जुलै रोजी एका महिलेसह दोन पुरुष असे तिघांना कोविड प्रतिबंधक 'कोव्हॅक्सिन’चा पहिला डोज देऊन राज्यात मानवी चाचणीचा शुभारंभ केला. दुसऱ्या दिवशी एका विद्यार्थ्यासह तीन पुरुष अशी चौघांना लस देण्यात आली. त्यानंतर पुढील चार दिवसात उर्वरीत ४८ व्यक्तींना ही लस देण्यात आली.१४ दिवसानंतर दुसºया डोजला सुरुवातगिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी सांगितले की, लस देण्यात आलेल्यांच्या रक्ताची तपासणी १४ दिवसानंतर केली जाईल. त्यानंतर त्यांना कोव्हॅक्सिन लसीच्या दुसºया डोज देण्यात येईल. पहिला डोज ‘०.५ मिलि’चा होता. आता तो वाढवून देण्यात येणार आहे.लसीचा पहिला डोज दिलेल्यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांची चमू लक्ष ठेवून आहे. सर्वांचीच प्रकृती उत्तम आहे. एका पुरुषाला काही मिनिटांसाठी थकवा आल्यासारखे जाणवले होते, परंतु थोड्यावेळातच तो बराही झाला. आता त्याला कुठलीही समस्या नाही. पहिल्या डोजचे चांगले रिझल्ट येण्याची शक्यता आहे.-डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, संचालक, गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर