शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आरटीओ : फेरतपासणीपासून २०० स्कूल बस दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:26 IST

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून ६ जूनपूर्वी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार आतापर्यंत साधारण ७०० स्कूल बसने फेरतपासणी करून घेतली, असून २०० स्कूल बस अद्यापही तपासणीपासून दूर आहेत.

ठळक मुद्दे७०० स्कूल बसची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून ६ जूनपूर्वी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार आतापर्यंत साधारण ७०० स्कूल बसने फेरतपासणी करून घेतली, असून २०० स्कूल बस अद्यापही तपासणीपासून दूर आहेत.फिटनेसचे प्रमाणपत्र असतानाही स्कूल बस ‘फिट’ राहत नसल्याच्या अनेक पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येतो. यापूर्वी अनेक घटनांमधून ही बाब पुढे आली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्कूल बसेसची फिटनेस चाचणी घेण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वैध आहे, त्यांना सुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्कूल बसेस फेरचाचणीकरिता सादर करणे बंधनकारक केले. फेर तपासणीत वाहनात दोष आढळून आल्यास दोषाचे निराकरण केल्यानंतर वाहन तपासणीसाठी पुन्हा सादर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. फेरचाचणीचा कालावधी ३ मे ते ६ जूनपर्यंत आहे. या कालावधीत आतापर्यंत ७०० स्कूल बसनी आपली तपासणी करून घेतली आहे. यातील ज्या बसेसचे फिटनेस या महिन्यात संपत आहेत त्यांनीही तपासणी केल्याची माहिती आहे. ६ जूनपर्यंत ज्या स्कूल बसने तपासणी केली नाही त्यांच्यावर आरटीओ कार्यालयाकडून कारवाई होणार आहे.फेरतपासणीला प्रतिसाद मिळत आहेएक महिन्याच्या कालावधीत साधारण ७०० स्कूल बसची फेरतपासणी करण्यात आली. स्कूल बसचालकांकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित २०० स्कूल बसही तपासणीसाठी आरटीओ कार्यालयात येतील, अशी अपेक्षा आहे.अतुल आदेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ शहर नागपूर

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीPublic Transportसार्वजनिक वाहतूकRto officeआरटीओ ऑफीस