शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

नागपुरात लयबद्ध योगमुद्रांनी फेडले डोळ्यांचे पारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 21:24 IST

विशाल पटांगणावर शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आबालवृद्ध, सूर्यनारायणाच्या साक्षीने एकाच वेळी लयबद्ध हालचालीत होणाऱ्या योगमुद्रा व ओंकारनादाचे सूर...अशा भारावलेल्या व सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वातावरणात नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे नागपूरकरांनी योगसंस्कारांचा अनोखा अनुभव घेतला. शहरातील हजारो आबालवृद्धांनी सांघिक योगासन करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी विद्यार्थ्यांनी लयबद्ध स्वरूपात योगमुद्रेचे प्रदर्शन केले.

ठळक मुद्देयोग दिनानिमित्त एकाच वेळी हजारो नागरिकांचे सांघिक योगासन : आबालवृद्धांनी अनुभवला योगसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : विशाल पटांगणावर शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आबालवृद्ध, सूर्यनारायणाच्या साक्षीने एकाच वेळी लयबद्ध हालचालीत होणाऱ्या योगमुद्रा व ओंकारनादाचे सूर...अशा भारावलेल्या व सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वातावरणात नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे नागपूरकरांनी योगसंस्कारांचा अनोखा अनुभव घेतला. शहरातील हजारो आबालवृद्धांनी सांघिक योगासन करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी विद्यार्थ्यांनी लयबद्ध स्वरूपात योगमुद्रेचे प्रदर्शन केले.योग समन्वय समिती नागपूर तसेच नागपूर महानगरपालिकेतर्फे गुरुवारी चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, महानगरपालिका आयुक्त वीरेंद्र सिंह, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाहक आणि ज्येष्ठ योगगुरू रामभाऊ खांडवे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी योगाभ्यासी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, विवेकासन, योगमुद्रा, मत्स्यासन, पर्वतासन, ताडकटी चक्रासन, पश्चिमोत्तान आसन,  गोमुखासन इत्यादी योग प्रकार सादर केले.यावेळी स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, माजी महापौर प्रवीण दटके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रजनी दीदी, मनीषा दीदी, एनसीसीचे ग्रुप कमांडर योगेंद्र पै, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा व  निसर्गोपचार संघटनेच्या डॉ. कीर्तिदा अजमेरा, जयप्रकाश गुप्ता, दयाशंकर तिवारी, भोजराज डुंबे हेदेखील उपस्थित होते. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रजनी दीदी यांनी राजयोगावर मार्गदर्शन केले. दयाशंकर तिवारी यांनी संचालन केले तर दिलीप दिवे यांनी आभार मानले.घराघरापर्यंत पोहोचावी योग चळवळ : बावनकुळेयावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नागरिकांसमवेत योगासन केले. नागपुरातील प्रत्येक घरात योगचळवळ पोहोचण्याची आवश्यकता आहे. तरुणांना योगसाधनेचे महत्त्व कळायला लागले आहे. त्याला केवळ योग्य दिशा देण्याची गरज आहे. मनपाने यासंदर्भात घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.संघटनांतर्फे करण्यात आली जागृतीया कार्यक्रमादरम्यान विविध स्वयंसेवी तसेच योगासनांशी निगडित संस्थांतर्फे आपापल्या पद्धतीने जनजागृती करण्यात आली. शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, एन.सी.सी., आर्ट आॅफ लिव्हिंग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, श्रीरामचंद्र मिशन, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नॅचरोपॅथी योग असोशिएशन, ईशा फाऊंडेशन, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, सहजयोग ध्यान केंद्र, योगसूत्र, श्रीयोग केंद्र, विवेक बहुजन हिताय संस्था, श्रद्धानंद अनाथालय आदींचा समावेश होता.तीन वर्षांपासून ते ९३ वर्षांपर्यंतचे योगसाधकयशवंत स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमाला सर्वच वयोगटातील नागरिक उपस्थित होते. अवघ्या तीन वर्षांच्या पूजा चोपडे या चिमुकलीने सर्वांना आपल्या योगसाधनेने थक्क केले.नगरसेवकांचा ‘दांडी’योगनागपूर मनपादेखील या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असल्यामुळे नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहील अशी अपेक्षा होती. भाजपाचे कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती, मात्र नगरसेवकांची उपस्थिती फारच कमी होती. बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकच कार्यक्रमाला दिसून आले. नगरसेवकांच्या या ‘दांडी’योगाची चर्चा उपस्थितांमध्ये कार्यक्रमानंतर रंगली होती. दुसरीकडे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी व महापौर नंदा जिचकार हे दोघेही दौºयानिमित्त बाहेर असल्याची बाब माहीत असूनदेखील कार्यक्रमपत्रिकेत अखेरपर्यंत त्यांचा उल्लेख कायम होता. याबाबतदेखील अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Yogaयोगnagpurनागपूर