शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांनो, आता वापरा 'माय नागपूर व्हॉट्सॲप चॅटबोट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:30 IST

सुविधांच्या लाभासाठी सेवा: आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेने नागरिकांसाठी एक महत्त्वाची डिजिटल सेवा सुरू केली आहे. आता 'माय नागपूर एनएमसी व्हॉट्सअॅप चॅटबोट' या नावाने नागपूरकरांना अनेक सुविधा घरबसल्या, फक्त व्हॉट्सअॅपद्वारे उपलब्ध होणार आहेत. मंगळवारी या सेवेचा शुभारंभ महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते महापालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात झाला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उपायुक्त मिलिंद मेश्राम आणि माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख स्वप्निल लोखंडे उपस्थित होते. ही सुविधा नागपूर महापालिकेच्या डिजिटल इंडिया दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असून, नागपूरकर नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे.

या सुविधेचे हे असतील फायदे

  • नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात येण्याची गरज नाही.
  • सर्व माहिती व सेवा घरबसल्या उपलब्ध 
  • वेळेची बचत आणि पारदर्शकता 
  • आपली मालमत्ता व पाण्याच्या देयकांची स्थिती समजणे सोपे होईल.

चॅटबोटच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा

  • मालमत्ता कराची माहिती व भरणा
  • यूपीआय नंबर टाकून कर भरणा
  • चालू वर्षाचे मागणी देयक
  • सवलती व दंडाची माहिती
  • ऑनलाइन भरणा लिंक
  • थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
  • ग्राहक क्रमांक टाकून थकबाकीची माहिती
  • मागील भरणा तपशील
  • ऑनलाइन पाणीपट्टी भरणा लिंक
टॅग्स :nagpurनागपूरWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप