लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा उन्हाळ्यात पहिल्यांदाच नागपूरचे कमाल तापमान ४६.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. भीषण गर्मीचा क्रम पुढेही सुरू राहणार आहे. हवामान खात्याने १ मेला नागपूरसह विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, वाशीम आणि यवतमाळला ‘रेड अलर्ट’वर ठेवले आहे. यंदा नागपूरचे तापमान ४७ अंशावर जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी ब्रह्मपुरीचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. ते मध्यभारतात सर्वाधिक होते.नागपुरात गेल्या २४ तासात दिवसासह रात्रीच्या तापमानात १.५ अंश सेल्सिअस वाढीची नोंद झाली आहे. निरंतर वाढत्या तापमानामुळे नागपूरकर त्रस्त आहेत. २ मे या दिवसी नागपूरसह अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टवर ठेवण्यासह दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. रेड आणि ऑरेंज अलर्टदरम्यान वयस्क, लहान मुले आणि आजारी व्यक्तीला दुपारी घराबाहेर जाण्यास मनाई केली आहे.
‘रेड अलर्ट’वर नागपूर, ४६.३ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:05 IST
यंदा उन्हाळ्यात पहिल्यांदाच नागपूरचे कमाल तापमान ४६.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. भीषण गर्मीचा क्रम पुढेही सुरू राहणार आहे. हवामान खात्याने १ मेला नागपूरसह विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, वाशीम आणि यवतमाळला ‘रेड अलर्ट’वर ठेवले आहे. यंदा नागपूरचे तापमान ४७ अंशावर जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी ब्रह्मपुरीचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. ते मध्यभारतात सर्वाधिक होते.
‘रेड अलर्ट’वर नागपूर, ४६.३ अंश सेल्सिअस
ठळक मुद्देतापमान ४७ अंशावर पोहोचण्याची शक्यता : मध्य भारतात ब्रम्हपुरी सर्वात ‘हीट’